- सीएफसी हे वातावरणातील घटक व पावसाच्या पाण्याची रिॲक्ट हाेत नाही. हे प्रदूषण फिरत जाऊन ओझाेनस्तरापर्यंत पाेहचते. येथे अतिनील किरणांमुळे सीएफसीचे विघटन हाेऊन क्लाेरिनशी रिॲक्शन हाेते व त्यामुळे ओझाेन थराला नुकसान हाेते.
भारतासारख्या देशामध्ये माेठे फेरबदल
- भारतासारख्या विकसनशील देशांना एचएफसीचे प्रदूषण २०४० पर्यंत ५० टक्के, तर २०४५ पर्यंत ८० टक्के कमी करायचे आहे.
- प्रदूषक असलेले जुने रेफ्रीजरेटर्स, एसी, फायर एक्सटिंगविशर्स कालबाह्य ठरतील. नवीन पर्याय शाेधावे लागतील.
- एअरसाेल, साॅल्व्हंट व क्लिनिंग साहित्याचाही पर्याय शाेधावा लागेल.
- यामुळे संशाेधन, उद्याेजकता व राेजगारालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- नीरीच्या प्रधान वैज्ञानिक बी. पद्मा एस. राव यांनी तयार केलेल्या पेपरच्या आधारे आपण ओझाेन थराची स्थिती समजून घेऊ शकताे.