लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले. हा अन्न नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.स्टोरमध्ये बुरशीयुक्त काजू व खराब शेंगदाण्याची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शाहीद शरीफ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली होती. त्या आधारे विभागाने कारवाई केली. तपासणीदरम्यान स्टोरमध्ये काजूचे पॅकेट उपलब्ध नव्हते. शरीफ यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायदा अमलात आला. पण फूड बिझनेस ऑपरेटर या कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. २६ जानेवारीला आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना असुरक्षित खाद्य पदार्थ विकण्यात येत असल्याचे प्रकरण पुढे आले. शरीफ यांनी स्वत: मेगा स्टोरमध्ये जाऊन पॅकबंद काजू आणि शेंगदाणे खरेदी केले होते. पॅकेटबंद दोन्ही खाद्यपदार्थांना बुरशी लागली होती.शरीफ म्हणाले, असुरक्षित खाद्य सामग्रीची विक्री करून मेगा स्टोर ग्राहकांना लुटत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. गेल्यावर्षी एफडीएच्या तपासणीत ३७ नमूने असुरक्षित आढळून आले होते. ७ प्रतिष्ठानांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते. नियमित तपासणी न करता अधिकारी मोठी घटना होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल त्यांनी केला.
नागपूरच्या मेगा मार्टमध्ये पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:09 PM
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई