शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

पद्मश्री हंसराज हंस यांच्या सुफियाना लोकसंगीताने नागपूरकर झाले दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 11:35 PM

सुविख्यात पंजाबी लोकगायक, सुफी गायक पद्मश्री खासदार हंसराज हंस सोमवारी नागपुरात दाखल झाले आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाला खऱ्या अर्थाने खासदारी रंग चढल्याची अनुभूती प्राप्त झाली.

ठळक मुद्देखासदार सांस्कृतिक महोत्सवाला चढला रंग ‘खासदारी’मराठी मातीतील ‘पंजाब दा पुत्तरांनी’ धरला ठेका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत जितका बहुभाषा, बहुसंस्कृतीने नटलेला तेवढ्याच बहुसांस्कृतिक आणि लोकपरंपरांनी समृद्ध झालेला देश. राज्यपरत्वे बदलत जाणारी वेशभूषा जसी मोहक तशीच संगीत परिभाषेची धाटणीही वेगळी. ग्लोबल युगात इतर गोष्टींप्रमाणे संगीताचेही आदानप्रदान झालेच आहे. मात्र, अभिजात संगीत ही हृदयीची भावना व्यक्त करते आणि ही भावना सहज या हृदयीचे त्या हृदयी वास करीत जाते. हा सगळा सार घेऊन सुविख्यात पंजाबी लोकगायक, सुफी गायक पद्मश्री खासदार हंसराज हंस सोमवारी नागपुरात दाखल झाले आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाला खऱ्या अर्थाने खासदारी रंग चढल्याची अनुभूती प्राप्त झाली. 

खासदार महोत्सवाच्या आयोजनाचा विस्तार यंदा प्रथमच करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसºया महोत्सवातील विस्तारित आयोजन उत्तर नागपुरातील लाल गोदामच्या बाजूला असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर सोमवारी करण्यात आले होते. ‘हंसराज हंस लाईव्ह इन कॉन्सर्ट’साठी मोठ्या संख्येने मराठी बांधवांसोबतच मूळ पंजाबी मात्र येथेच स्थायिक झालेले पंजाबीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सुफी गायकीची महती व्यक्त करीत त्यांनी सुफियाना संगीताचे जनक अमीर खुसरौ यांना वंदन करीत कार्यक्रमास सुरुवात केली. ‘जिंदगी दी है तो जिने का हुनर भी देना’ या सुफी गीताने अगदी प्रारंभीच रुहानी मैफिलीचा आगाज झाला. बडे साहिब अर्थात सच्चे पातशाह गुरू नानक देवजी यांना ही गजल अर्पण होती. त्यानंतर, खास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूरकरांसाठी ‘उसे मिल गये दोनो जहाँ, जिसे तूने दर पे बुला लिया’ ही गजल सादर करीत गडकरींच्या नेतृत्वाचे गुणगौरव केले. केंद्र सरकारमधील पहिल्या क्रमांकाचे मंत्री म्हणून गडकरींचा गौरव करीत, त्यांच्या कामाची पावती बघण्यासाठी संपूर्ण देशाचा प्रवास करण्याचे आवाहन हंसराज हंस यांनी यावेळी केले. त्यानंतर सुफियाना अंदाजातील ‘सुनो महाराजा जगत के वाली’ हे गीत अशा काही तयारीने सादर केले की जणू संपूर्ण श्रोतृवृंद तल्लीन झाला होता.त्यानंतर कच्छे धागे, बिच्छू, जोडी नंबर १, शहीद, नायक चित्रपटातील गाणी सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास बाध्य केले. यावेळी मस्तमौला पंजाबी मानसिकतेची अनुभूती झाली. सगळेच जण आपापल्या जागेवर भांगडा करण्यास सज्ज झाले.काहींनी हंसराज हंस यांच्या पुढे येऊन नाचण्यास सुरुवात केली. हंस यांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद देत मस्तमौला गाणी सादर करीत सोमवारची रात्र रंगीन करून सोडली. यावेळी हंसराज हंस यांच्यासह त्यांना वाद्यांवर संगत करणाºया मोहम्मद युनूस, महेश कुमार, सादिक अली, सोहेल खान, गुरुनाम सिंग, कश्मीर मोहम्मद आणि कुलविंदर सिंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, आमदार अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, अनिल भारद्वाज, नवनीतसिंग तुली, परविंदर सिंग, हरदेव सिंग बाजवा उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.नितीन गडकरी यांनी दिला व्हिडीओ संदेशहिवाळी अधिवेशनाचे संसदेचे उशिरापर्यंत चाललेले सत्र आणि नंतर लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच असलेल्या विशेष बैठकीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कॉन्सर्टला हजर राहू शकले नाही. त्यांनी आपला संदेश व्हिडीओमार्फत पाठविला आणि नागपूरकर व हंसराज हंस यांचे आभार मानले. हंसराज हंस यांनी सत्काराला उत्तर देताना, गडकरी यांची उणीव भासत असल्याची भावना व्यक्त केली. ज्यांना मानतो त्यात गडकरी यांचा समावेश असल्याचे ते यावेळी म्हणाले.ये नागपूर के लोग है, बडे शौकीन हैगायनादरम्यान त्यांनी नागपूरकरांच्या वैशिष्ट्याबद्दल भावना व्यक्त केल्या. नागपूरकर जीवनशैलीशी अनुसरून ‘ये नागपूर के लोग है, बडे शौकीन है’ असे काही जणांनी सांगितले होते. त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेत असल्याचे हंसराज हंस म्हणाले.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिक