लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : लाॅकडाऊन काळात अवैध दारू विक्रेत्यांनी डाेके वर काढताच पाेलिसांनी धाडी टाकून त्यांच्याविरुद्ध बडगा उगारला आहे. काटाेल पाेलिसांच्या पथकाने डाेंगरगाव (ता. काटाेल) व काटाेल शहरातील पंचवटी भागालगतच्या वस्तीत धाडी टाकून माेहफुलाच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शिवाय, अवैध दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ७१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. २४) दुपारी करण्यात आली.
काटाेल-सावरगाव मार्गावरील डाेंगरगाव शिवार माेहफुलाच्या दारूनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी दारूनिर्मिती केली जात असल्याची माहिती मिळताच काटाेल पाेलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी या परिसराची पाहणी केली. तिथे माेहफुलाची दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. यात पाेलिसांनी संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त केली. शिवाय, मोतीन नागेश पवार (२५), रमण पवार (२२), राजपाल संतोष राजपूत (५२), अजय नाना भोसले (२३), जगदीश अरुण पवार (३८) यांच्यासह महिलेस ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे नाेंदविण्यात आले. ते सर्व डाेंगरगाव, ता. काटाेल येथील राहणारे आहेत.
दरम्यान, काटाेल पाेलिसांच्या दुसऱ्या पथकाने काटाेल शहरातील पंचवटी लगतच्या भागात धाड टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या प्रेमसिंग करणसिंग आदा (६०), जोगेद्रसिंग करणसिंग आदा (४७), दीपसिंग जोगेद्रसिंग आदा (२५), सिंकदर प्रेमसिंग आदा (३२) या चाैघांवर गुन्हे नाेंदवून कायदेशीर कारवाई केली. या दाेन्ही धाडींमध्ये ४१२ लिटर माेहफुलाची दारू, एक माेटरसायकल व इतर साहित्य असा एकूण ७१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, आश्विनी वानखडे, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, लांजेवार, सुनील कोकाटे यांच्या पथकाने केली.
....
चढ्या भावाने विक्री
लाॅकडाऊन काळात दारूची दुकाने बंद असल्याने देशी व विदेशी दारू मिळेनाशी झाली आहे. त्यातच दारूच्या किमतीतही माेठी वाढ करण्यात आल्याने शाैकिनांना ती चढ्या भावाने खरेदी करावी लागते. याला पर्याय म्हणून माेहफुलाच्या दारूनिर्मिती आणि विक्रीत माेठी वाढ झाली असून, ग्रामीण भागातील माेहफुलाची दारू काटाेल शहरात आणून विकली जात आहे.