कामठी : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात पाेलिसांनी साेमवारी (दि.१९) रूट मार्च करीत शांततेचे आवाहन केले. ईद पर्वावर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून पाेलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.
जुनी व नवीन कामठी पाेलीस स्टेशनचे ठाणेदारद्वय राहुल शिरे व विजय मालचे यांच्या नेतृत्वात या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील नेताजी चाैक, बाेरकर चाैक, भाजी मंडी, काेळसा टाल, रब्बानी चाैक, वारीसपुरा, फेरुमल चाैक, हरदासनगर, हैदरी चाैक, मुख्य मार्गाने भ्रमण केल्यानंतर जुनी कामठी ठाण्यात समाेराप झाला. रूट मार्चदरम्यान मुस्लीम बांधवांनी शासनाने दिशानिर्देशित केलेल्या काेराेनाच्या नियमांचे पालन करावे, असे सांगितले. या रूट मार्चमध्ये दुय्यम पाेलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, रामदास पाटील, युनूस शेख तसेच जुनी व नवीन ठाण्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग हाेता.