लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सैन्यदलाच्या निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने गुरुवारी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी चौकशी करून मृत व्यक्तीची ओळख पटविली. राजेंद्र वासुदेव नंदरधने (वय ४२) असे मृताचे नाव असून तो सहकारनगर खरबीतील रहिवासी होता, असे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.नंदरधने पेंटिंगचे काम करायचा. दोन आठवड्यांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र तो आढळला नाही. त्यामुळे पोलिसांकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सीताबर्डीतील सैन्यदलाच्या ११८ बटालियन कॅम्पच्या नवनिर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून तीव्र दुर्गंध येत असल्याने काही जणांनी तिकडे जाऊन बघितले असता तेथे एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे सैन्य दलाच्या अधिकाºयांनी सीताबर्डी पोलिसांना कळविले. ठाणेदार हेमंत खराबे यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले. निर्माणाधीन इमारत असल्याने आणि सध्या काम बंद असल्याने तिकडे फारसे कुणी फटकत नव्हते. मृतदेह पूर्णत: कुजला होता. कुत्र्यांनी त्याची अवस्था आणखीच वाईट केली होती. पोलिसांनी मृताच्या कपड्याची तपासणी केली असता त्यात एक मोबाईल आणि कागदपत्र आढळले. त्यातून तो मृतदेह नंदरधनेचा असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधला. त्यांच्या घरच्यांना बोलवून घेण्यात आले. त्यांनी मृताची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.गळफास लावून घेतलासदर इमारतीत पेंटिंगचे काम सुरू होते. त्यावेळी (सुमारे दोन आठवड्यांपूर्वी) नंदरधने तेथे आला. त्याने बाजूची शिडी उचलून सिलींग फॅनच्या लोखंडी हुकला दोरी बांधली आणि गळफास लावून घेतल्याचा अंदाज वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी बांधला आहे. दरम्यान, सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. नंदरधनेची मोटरसायकलही काही दिवसांपूर्वी बेवारस अवस्थेत या परिसरात आढळली होती, हे विशेष !
नागपुरात सैन्यदलाच्या इमारतीत पेंटरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:00 AM
सैन्यदलाच्या निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने गुरुवारी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी चौकशी करून मृत व्यक्तीची ओळख पटविली. राजेंद्र वासुदेव नंदरधने (वय ४२) असे मृताचे नाव असून तो सहकारनगर खरबीतील रहिवासी होता, असे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
ठळक मुद्देपरिसरात खळबळ : मोबाईलवरून पटली ओळख