उमरेड : शाळा, महाविद्यालये सुरू असताना वर्षभरातून कसेबसे शाळेच्या भिंती बोलक्या करण्याचे काम हाताला मिळत होते. याच पेंटरबाबूंच्या कलाकुसरीतून शेकडो मुर्त्यासुद्धा आकाराला येत होत्या. कोरोना आला. सारेकाही घेवून गेला. अनेकांना काम मिळेनासे झाले. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले. अशा व्यथा मांडत उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील पेंटर संघटना एकवटली आहे. आलेल्या कठीण परिस्थितीचा आम्ही हिंमतीने मुकाबला करू, असा निर्धार व्यक्त करीत स्थानिक ज्येष्ठ नागरिक मंडळ भवनात सदर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर पेंटर संघटनेचे अध्यक्ष श्याम मेश्राम होते. यावेळी महाराष्ट्र पेंटर संघटनेचे उपाध्यक्ष अमरजित तांबे, दिगांबर बागडे, दिनेश ढोले, रवी सायवान यांची उपसिथती होती. याप्रसंगी उमरेड विभागाच्या कार्यकारिणीची निवडसुद्धा केल्या गेली.
संजय मौदेकर यांची अध्यक्षपदावर तसेच विलास मदनकर यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्यानिवंत बावणे (उपाध्यक्ष), खुशाल भजनकर (कोषाध्यक्ष), संजय बावणे (सहसचिव) यांचीही निवड झाली. संचालन प्रेम चांदुरकर यांनी केले. देवा चट्टे यांनी आभार मानले. देऊ खेळकर, सुधीर कांडळकर, केवळराम बोंदरे, प्रफुल्ल डांगे, शेरदिल मडावी, महादेव ठमके, पवन खंडारे, आशिष भोयर, देवा मराठे, राहुल चिमुरकर, योगेश देव्हारे, सुरज सहारे आदींनी सहकार्य केले.