नागपूर : लीलाताई देशपांडे स्मृती अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेत अद्रिजा नाग व गुंजन शर्मा या विद्यार्थिनींनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रहार जागृती संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा विषय ‘स्वर्णिम विजय वर्ष - १९७१च्या भारत-पाक युद्धाचे ५०वे वर्ष’ हा होता. ही स्पर्धा वर्ग ३ ते वर्ग ६ अशा ‘अ’ व वर्ग ७ ते वर्ग १० अशा ‘ब’ गटात पार पडली. स्पर्धेत ‘अ’ गटात अद्रिजा नाग प्रथम, भार्गवी हटवार द्वितीय तर गीतांश साबळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. ओम शेंद्रे याला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘ब’ गटात गुंजन शर्मा प्रथम, आकर्ष गडपाल द्वितीय तर वेदांत काटकर याला तृतीय पुरस्कार आणि तनुश्री ढोरे हिला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासोबतच प्रीती भौमिक, अंकित पिल्ले, भव्य, अमन रक्षक, अवंतिका घोष, सात्विक देशपांडे, विराज वैद्य, शंतनू वानखेडे, अवनी रोमडे, ध्रुव गवळी, नकुल काकडे, प्रीती भड, पौर्णिमा मोरे, राजकन्या बम्होरे, घेमराज सकोडे, मोहित निकाजू, कामिनी श्रगर, अजय चौघरी, प्रणाली घोडसे यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
..............