शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पकड मोरी बय्या करत बरजोरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:40 AM

संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली.

ठळक मुद्देपंडित प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोह : शिष्यांची गुरुला स्वरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संगीत महामहोपाध्याय ही उपाधी प्राप्त गुरू पं. प्रभाकर देशकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन बुधवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प. देशकर यांना त्यांच्या शिष्यांतर्फे संगीतमय मानवंदना देण्यात आली.श्री संगीत विद्यालय, लक्ष्मीनगरतर्फे ‘सिद्धी’ या शिर्षकांतर्गत आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला पं. देशकर यांची शिष्या गीता गुलवाडी यांचे शास्त्रीय गायन व उत्तरार्धात नवोदित प्रतिभावान युवा कलाकार अथर्व भालेराव (व्हायोलिन), आदित्य गोगटे (बासरी), तरुण लाला (तबला), अनिकेत बारापात्रे (ड्रम्स), परिमल वाराणशीवार यांच्या रागसंगीताच्या जुगलबंदीने श्रोत्यांना अनोखा आनंद प्रदान केला. गीता गुलवाडी यांनी गुरुप्रति समर्पित गायनाने प्रथम स्वरांजली अर्पण केली. गुरुजनांच्या मार्गदर्शनासह किराणा, जयपूर-अत्रोली व ग्वाल्हेर घराण्याचे संमिश्र, सौंदर्यात्मक शैलीतील घरंदाज सादरीकरण त्यांनी केले. ‘राग मुलतानी’सह त्यांनी गायनाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिश ‘ऐसी लगन लगायो...’, मध्य तीन तालातील ‘पकड मोरी बय्या करत बरजोरी...’ व एकतालातील द्रुत तराणा यासह रागविस्तार झाला. रसिल्या अर्थभावाच्या बंदिशीचे भावपूर्ण सादरीकरण प्रसन्नतेने निनादले. यानंतर मिश्र खमाज रागातील ‘तुम राधे बनो हम शामबिहारी...’ या प्रासादिक बंदिशीसह ‘मेरो मन गुरुचरणन...’ या गुरुवंदनेने गायिकेने आपले गायन संपविले. त्यांना संदीप गुरमुळे (संवादिनी), नीलेश खोडे (तबला) व पल्लवी ठेंगे (तानपुरा) या कलावंतांनी साथसंगत केली.कलाकार व श्रोता यांना शब्दांच्या पलिक डची सुखद अनुभूती प्रदान करणारी व दीर्घकाळपर्यंत नादावून टाकणाऱ्या विविध वाद्यांच्या खुमासदार अशा जुगलबंदीने या समारोहाला विशेष रंगत आणली. अथर्व भालेराव, आदित्य गोगटे, तरुण लाला, अनिकेत बारापात्रे व परिमल वाराणशीवार यांच्या परस्पर भिन्न अशा व्हायोलिन, बासरी, तबला, ड्रम्स व सिंथेसाईजर या वाद्यांचे सहज सुंदर व खुमासदार सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक भारतीय व पाश्चिमात्य वाद्यांचे हे श्रवणीय फ्युजन आनंद देणारे ठरले. या कार्यक्रमादरम्यान पं. देशकरांचे शिष्य अरविंद उपाध्ये यांना शेवाळकर संगीत महाविद्यालयातर्फे पं. देशकर स्मृती पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले. सहआयोजनक सप्तकचे डॉ. उदय यांनी प्रास्ताविक केले. आयोजनात अनुराधा हळवे-पाध्ये यांचा सहभाग होता.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर