शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान; उज्ज्वल निकम यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:29 PM

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनमंच जनगौरव व जनसेवक पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून दहशतवाद्यांविरुद्ध खटले चालविले आहेत.अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते रविवारी सेवानिवृत्त प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जनमंच जनगौरव पुरस्कार तर, सरकारी अधिकारी अजय लहाने यांना जनमंच जनसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. उपलेंचवार यांनी ‘विद्यार्थी सहायक समिती’च्या माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. लहाने कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. हे पुरस्कार जनमंच या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी दिले जातात. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलस्थित साई सभागृहात पार पडला.निकम यांनी पाकिस्तानवर थेट नेम साधला. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट पाकिस्तानमध्ये शिजले होते. त्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही. भारताला आवश्यक सहकार्य देत नाही. पाकिस्तान हा भारताकरिता अतिशय धोकादायक देश आहे. त्यामुळे भारतीयांनी सतत सावधान राहून देशातील शांतता कायम ठेवली पाहिजे. वर्तमान काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे. डोकी भडकवणारे संदेश पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सत्य जाणूनच पुढील कृती केली पाहिजे. आजच्या परिस्थितीत तरुणांमध्ये देशप्रेमाचे बीज पेरणे आवश्यक झाले आहे असे निकम यांनी सांगितले.शिक्षणामुळे लोक सुशिक्षित होतात. त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी चांगल्या विचारांचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. चांगले काम करणाऱ्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. त्याविरुद्ध लढण्याची शक्ती आत्मविश्वासातून प्राप्त होते. संकटे आल्यानंतर कधीच निरुत्साही होऊ नका. मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. संकटांवर मात करूनच यशाची शिखरे गाठता येतात. चांगले काम करताना प्रामाणिकपणाचा दुर्गुण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही निकम यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी संचालन, जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी प्रास्ताविक तर, महासचिव नरेश क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले.

‘प्रकाशवाट’च्या शिक्षकांचा गौरवजनमंचचा ‘प्रकाशवाट’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राबत असलेले शिक्षक अली, टाले, बांबल, सावरकर व देवके यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. इयत्ता नववीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची तयारी करून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण विदर्भात तालुकास्तरावर राबविला जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी अली, टाले, बांबल, सावरकर व देवके या शिक्षकांनी तालुक्यातील ३७ गावे फिरून १०५ विद्यार्थी गोळा केले आहेत.

मी जनमंचचा अ‍ॅम्बेसडरअ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ते कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता जनमंचचे अ‍ॅम्बेसडर होण्यास तयार असल्याची घोषणा केली. जनमंच अतिशय उत्तम कार्य करीत असून या संस्थेमुळे राज्यातील अनेक प्रश्न सुटले आहेत. या संस्थेचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातून प्रेरणा मिळून राज्यात चळवळ उभी राहील. खटल्यांच्या निमित्ताने राज्यभर फिरत असतो. यादरम्यान जनमंचचा अ‍ॅम्बेसडर म्हणून कार्य करण्यास आपली तयारी आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षक-विद्यार्थ्यांत जिव्हाळा असावाविद्यार्थ्यांशिवाय माझ्या व माझ्याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. विद्यार्थी शिक्षकपरायण, शिक्षक विद्यार्थीपरायण, दोघेही ज्ञानपरायण व ज्ञान सेवापरायण असायला हवे. तसेच, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते असावे.- प्रा. मधुकर उपलेंचवार

सार्वजनिक पैशांची उधळपट्टी नकोसरकारी अधिकाऱ्यांने विकासकामे करताना सार्वजनिक निधीची उधळपट्टी करू नये. निधी वाचवणे म्हणजे निधी गोळा करणे होय. सरकारी अधिकाऱ्यांची सध्याची अवस्था वाईट आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेशी भांडावे लागते.- अजय लहाने

दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीकमधुकर उपलेंचवार व अजय लहाने हे दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीक आहेत. दोघेही हिशेबी व्यक्ती नाहीत. त्यांनी स्वत:ला समाजाकरिता अर्पण केले आहे. स्वत: चांगले आयुष्य जगायचे सोडून ते वंचितांना आधार देण्यासाठी लढत आहेत.- प्रा. शरद पाटील

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम