लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात उभारण्यात येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन इमारतीत निर्माण होणाऱ्या प्रयोगशाळेत वर्षाला अन्नाचे ५ हजार नमुने तर औषधांच्या २,५०० नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे सचिव संजय देशमुख, औषध विभागाचे (मुख्यालय, मुंबई) सहआयुक्त अमृत निखाडे, नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे, सहआयुक्त (औषधे) राकेश तिरपुडे, सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे, शरद कोलते उपस्थित होते.दराडे म्हणाल्या, सध्या वर्षाला अन्नाचे २५० नमुने तर औषधांच्या १०० नमुन्यांची तपासणी होते. नवीन इमारतीत अन्न व औषध विभागाचे कार्यालय आणि प्रयोगशाळा अडीच ते तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. १५०० चौरस मीटर जागेवर ३३५५ चौरस मीटर बांधकामात सहा माळ्याची इमारत उभी राहणार आहे. तळमजला वाहनतळाकरिता, पहिला माळा औषधी विभाग, दुसरा अन्न विभाग, तिसरा औषधे नमुने चाचणी प्रयोगशाळा, चौथा अन्न नमुने चाचणी प्रयोगशाळा आणि पाचव्या माळ्यावर सभागृह राहील. ४७ नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.ई-फार्मसीवर दराडे म्हणाल्या, आॅनलाईनने औषधे लोकांच्या हाती जातात, हे खरे आहे. पण महाराष्ट्रात अशा कंपन्यांवर सर्वाधिक कारवाई झाली आहे. दररोज नवीन साईट उदयास येतात. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर विभागाचे लक्ष आहे. पांढरे व निळ्या बर्फासंदर्भात त्या म्हणाल्या, राज्यात २२ ते २५ कारखान्यांमध्ये निळा बर्फ तयार होतो. या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.संजय देशमुख म्हणाले, औषधांच्या खरेदीसाठी हाफकिनने २७ निविदेवर निर्णय घेतला आहे. औषधी खरेदीचे अधिकार डीनस्तरावर दिले आहेत. पूर्वी १४० कोटी तर आता १९० कोटी मिळाले आहे. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटीचा विस्तार उपकरणांसह यावर्षीच्या अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. मेडिकलमध्ये कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.कार्यालय व प्रयोगशाळेचे भूमिपूजनअन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन कार्यालय आणि प्रयोगशाळेचे भूमिपूजन २९ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय भुपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित राहतील.
नवीन प्रयोगशाळेत ७,५०० नमुने तपासणार : पल्लवी दराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:35 PM
नागपुरात उभारण्यात येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन इमारतीत निर्माण होणाऱ्या प्रयोगशाळेत वर्षाला अन्नाचे ५ हजार नमुने तर औषधांच्या २,५०० नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रयोगशाळा