शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

नंदनवनचा पीएसआय एसबीच्या जाळ्यात

By admin | Published: January 07, 2016 3:35 AM

नंदनवन पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने पकडले.

१५ हजारांची मागितली लाच : पोलीस विभाग हादरलानागपूर : नंदनवन पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी १.३० वाजता करण्यात आली. एकाच दिवशी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस विभाग हादरून गेला आहे. रामेश्वर राऊत (५२) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तक्रारकर्ता पद्माकर बावणे यांना संपत्ती कर विभागाचे डिमांड नोट वितरित करण्याचे कंत्राट मिळाले आहे. श्यामली परसागरे नावाची महिला त्यांच्याकडे काम करीत होती. डिमांड नोट वेळेवर वितरित न केल्यामुळे बावणे यांनी श्यामलीला एकदा फटकारले होते. ६ डिसेंबर रोजी श्यामलीने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास राऊत यांच्याकडेच होता. राऊत यांनी बावणेमुळेच श्यामलीने आत्महत्या केल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये मागितले. आपण निर्दोष असल्याने आपल्याला कुठलाही त्रास देऊ नये, अशी विनंती केली. राऊत यांनी २० ऐवजी १५ हजार रुपये देण्यास सांगितले. बावणे यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने प्राथमिक चौकशी केला असता लाच मागितल्याचे आढळून आले. त्यानुसार राऊतला पकडण्याची योजना आखण्यात आली. योजनेनुसार बुधवारी दुपारी १.३० वाजता बावणे पैसे घेऊन नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचले. राऊत यांची साप्ताहिक रजा होती. ते ठाण्याजवळच राहतात. अधिकाऱ्यांनी केला पाठलाग नागपूर : राऊत यांनी बावणेला नंदनवन सिमेंट रोड स्थित एका हॉटेलच्या मालकाजवळ पैसे देण्यास सांगितले. बावणेने हॉटेल मालकला ११,५०० रुपये दिले. तसेच दूर लपून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. एसीबीचे अधिकारी राऊत यांच्यावर नजर ठेवून होते. दरम्यान हॉटेल मालकाजवळून पैसे घेऊन राऊत बाहेर जाताना दिसले.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. राऊत यांना शंका आली. त्यांनी पैसे फेकून दिले. काही दूर गेल्यावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. परंतु जवळ पैसे नसल्याने एसीबीचे अधिकारीही विचारात पडले. राऊत हे सहायक उपनिरीक्षक म्हणून अजनीत तैनात होते. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान वसुली केल्याच्या तक्रारीनंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. दीड वर्षांपूर्वीच ते नंदनवन पोलीस ठाण्यात आले. ही कारवाई एसीबीचे एसपी राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे, निरीक्षक शुभांगी देशमुख, मोनाली चव्हाण आदींनी केली.