शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सायकोमुळे रेल्वे स्थानक परिसरात दहशत; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

By नरेश डोंगरे | Published: April 08, 2024 11:34 PM

चुकून कुणी त्याच्या जवळ आले किंवा त्याच्या जवळून कुणी जाताना त्याला दिसले की त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्याचा गळा दाबून असंबंध बरळतो.

नागपूर : रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच्या परिसरात घुटमळणाऱ्या एका सायकोमुळे गेल्या काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानक परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. कुणी जवळ आले किंवा जवळून जाताना दिसले की तो त्या व्यक्तीच्या अंगावर धावतो अन् त्याचा थेट गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. अंदाजे तीस वर्षांचा हा मणोरुग्ण फाटके, मळकट कपडे घालून दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरही जखम आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवसभर घुटमळतो.

चुकून कुणी त्याच्या जवळ आले किंवा त्याच्या जवळून कुणी जाताना त्याला दिसले की त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्याचा गळा दाबून असंबंध बरळतो. रविवारी असाच एक सैन्याचा जवान त्याच्या जवळून जात असताना हा मणोरुग्ण त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याने जवानाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

जवानाने प्रारंभी त्याला झटकले मात्र तो पुन्हा अंगावर येत असल्याचे पाहून त्याचे कान चांगल्या प्रकारे शेकले. त्यानंतर मात्र हा मणोरुग्ण पळून गेल्याचे सांगितले जाते. आज पुन्हा तो रेल्वे स्थानकाच्या बाह्य परिसरात वेड्यासारखे चाळे करताना आढळला. त्याच्या उपद्रवामुळे ऑटोवाले, कुली यांच्यातही दहशत निर्माण झाली आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.