नागपूर : पानिनो रेस्टॉरंट शृंखलेची सुरुवात डिसेंबर २०१० मध्ये नागपुरात २०० चौरस फूट जागेत झाली. सध्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे १० रेस्टॉरंट सुरू आहेत. विस्तारीकरणात छत्तीसगडमध्ये १२ रेस्टॉरंट सुरू करणार आहे. २०२० पर्यंत कंपनीचे संपूर्ण देशात १०० रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना असल्याची माहिती पानिनोचे संस्थापक संचालक अंकित अग्रवाल यांनी दिली.मानेवाडा रोड, पतंजली स्टोरवर पानिनोच्या फ्रे न्चाईसी स्टोरचे उद्घाटन व्हीआयएचे उपाध्यक्ष सुरेश राठी आणि किशोर ठुठेजा यांच्या उपस्थितीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांच्या हस्ते बुधवारी झाले. मंदार सरोदे फ्रे न्चाईसी संचालक आहेत.पत्रपरिषदेत अंकित अग्रवाल म्हणाले, पानिनो आसपासच्या क्षेत्रात काम करणाºया लोकांसाठी त्यांच्या सुटीच्या दिवशी ‘झिंगालाला वेड्नस्डे’ म्हणजे पानिनोमध्ये रविवार हा आनंद साजरा करण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू करत आहे. त्यांना रोमांचक संगीतासह विशेष सेवा, आकर्षक सवलती व फूड कॉम्बोज देणार आहे. हा पानिनोचा फ्लॅगशीप प्रोग्राम नागपूरमधील सर्व आठ रेस्टॉरंट व चंद्रपुरातील एका रेस्टॉरंटमध्ये एकाच वेळी सुरू करणार आहे. अग्रवाल म्हणाले, आमची डोमिनोजशी स्पर्धा आहे. खाद्यशौकिनांमध्ये आनंद पसरविणारा पानिनोचा ‘सँडविच वर्ल्ड’ हा मध्य भारतातील प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. थोडा तिखट, थोडा आंबट अशी पारंपरिक चव देण्याचा प्रयत्न आहे. सावजी सँडविच आहे. कापसी येथे १० हजार चौरस फूट जागेत सेंट्रल किचन तयार होणार आहे. ब्रेड कंपनी तयार करणार आहे. या वेळी पानिनोचे संस्थापक संचालक अंबुज अग्रवाल आणि सहसंस्थापक संचालक जिगर हंसोरा उपस्थित होते. (वा.प्र.)
पानिनो देशात २०० रेस्टॉरंट सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:45 AM
पानिनो रेस्टॉरंट शृंखलेची सुरुवात डिसेंबर २०१० मध्ये नागपुरात २०० चौरस फूट जागेत झाली. सध्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे १० रेस्टॉरंट सुरू आहेत. विस्तारीकरणात छत्तीसगडमध्ये १२ रेस्टॉरंट सुरू करणार आहे.
ठळक मुद्देअंकित अग्रवाल : फे्रन्चाईसी रेस्टॉरंटचे उद्घाटन