नागपूर : नंदनवन परिसरात सध्या असामाजिक तत्त्वाचा वावर वाढला आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच केडीके महाविद्यालयासमाेर एका तरुणाने एका तरुणीवर भरदिवसा चाकूहल्ला केला हाेता. तरुणींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, संशयावरून पत्नीला मारहाण, रोडरोमिओंनी मुलींच्या मागे लागणे अशा स्वरूपाच्या अनेक घटना गेल्या काही दिवसापासून या भागात राजरोसपणे घडत आहेत. महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नंदनवन पाेलीस स्टेशनचे अस्तित्व आहे की नाही, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. ही अवस्था पाहता वूई फाॅर चेंज या संघटनेतर्फे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले. योगिता भिवापूरकर, प्रा. रश्मी पारस्कर, अलका वेखंडे, सुजाता लॊखंडे यांनी निवेदन सादर करून हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
नंदनवन परिसर महिलांसाठी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 4:26 AM