लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. शिक्षण व्यवस्थेची अवस्थासुद्धा दयनीय असून अलीकडे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणावर भर आहे. मोबाईल आवश्यक असला तरी त्याचे विपरीत परिणाम मुलांवर दिसून येत आहेत. तेव्हा सतर्क राहा. मुलांना वेळ द्या. हिंमत द्या, अशी कळकळीची विनंती बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष मेश्राम यांनी केली. कोलपॉवर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित शिक्षक सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
स्थानिक जीवन विकास विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय दाढे होते. याप्रसंगी प्राचार्य विवेक विघ्ने, संयोजक कृष्णकुमार मिश्रा यांची उपस्थिती होती. प्रारंभी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी लता भोयर, नीलम लाडे, पूनम मेश्राम, वर्षा मेश्राम, मीनल कांबळे, अनिता सदावर्ती, श्वेता मोहोड आदींचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय संगीता मिश्रा व वृषाली वंजारी यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन शैलेश रहांगडाले यांनी केले. विश्वास गोतमारे यांनी आभार मानले. सीमा बैस, जॉली पुरी, विजय येवले, चैताली दाढे, अरोल दास, वर्षा येवले, संजीव दीक्षित, संजय घुग्घुसकर, तृप्ती दीक्षित, शशिकांत पवार आदींनी सहकार्य केले.