लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा पालक एखाद्या लाखभर पगार कमावणाऱ्या यशस्वी मुलाला पाहून आपला पाल्य आयआयटीमध्येच शिकला पाहिजे, डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाला पाहिजे, यासाठी मुलांवर दबाव टाकतात. काही लोक आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पाल्यांनी पूर्ण कराव्यात म्हणून दडपण आणत असतात. हा प्रकार म्हणजे मुलांना ‘चुहा दौड’(रॅट रेस)मध्ये पळायला लावण्यासारखे आहे. आयआयटी, इंजिनीअरिंग केलेली सर्वच मुले यशस्वी होतातच असे नाही. त्यापेक्षा एखादा आयटीआयसारखा साधा कोर्स करूनही इंजिनीअरिंग करणाऱ्यांपेक्षा यशस्वी झालेले आपल्या अवतीभोवती दिसून येतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर रॅट रेसची घोडदौड लादू नये, असे अंतर्मुख करणारे आवाहन वानखेडे मॅडम्स करिअर अकादमीच्या संचालक अनिता वानखेडे यांनी केले.लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे लोकमत समूहातील सदस्यांच्या प्रज्ञावंत पाल्यांचा ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित अनिता वानखेडे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अकादमीचे संचालक नरेंद्र वानखेडे यांच्यासह लोकमत समूहाचे असि. व्हाईस प्रेसिडेंट (इलेक्ट्रानिक्स) राम सावजी, असि. व्हाईस प्रेसिडेंट (अकाऊंट्स), संजय खरे, जाहिरात विभागाचे सहमहाव्यवस्थापक आसमान सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. अनिता वानखेडे पुढे म्हणाल्या, दहावीपर्यंतच्या मुलांना करिअरबाबत फारशी जाणही नसते. या वयात त्यांना पालकांच्या मदतीची गरज असते. दहावीपर्यंतच्या मुलांना भरपूर मैदानी खेळ खेळण्याची संधी द्या, बाहेर खेळण्याची मनाई करू नका. टीव्ही, मोबाईलच्या खेळामुळे बुद्धीचा विकास खुंटतो तर मैदानी खेळांमुळे मेंदूला नावीन्यपूर्ण गोष्टीची चालना व बुद्धीच्या विकासाला गती येते. यामुळे दहावीपर्यंत ते अभ्यासाने थक त नाही व करिअर निवडण्याच्या ऐनवेळी ते फ्रेश राहतात. मुलांवर सतत अभ्यासाचे, परीक्षेचे दडपण देऊ नका. स्वत:च्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाच्या इच्छा मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्या कुवतीनुसार, कौशल्यानुसार करिअर निवडू द्या. त्यांनी मुलांनाही सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे, अपयशाने खचू नका, भाषेचा, परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता परिश्रम घेऊन यश प्राप्त करण्याचे मार्गदर्शन केले.यावेळी नरेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात करिअरबाबत प्रचंड स्पर्धा आहे. इंजिनीअर किंवा डॉक्टर अशा विशिष्ट क्षेत्रातच करिअर करण्याच्या प्रत्येकाच्या इच्छेमुळे ही स्पर्धा निर्माण झाली आहे, जी अपरिहार्य आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनाही पुढे काय करायचे, याची जाण नसते.इतरांना पाहूनच डॉक्टर किंवा इंजिनियरिंगमध्ये करिअर निवडला जातो. म्हणून या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. अशावेळी स्पर्धेत वरचढ ठरण्यासाठी दहिहंडीप्रमाणे चढाओढ करावी लागते. मात्र देशातच हजारो क्षेत्र असे आहेत ज्यात यशस्वी करिअर करण्याच्या असंख्य संधी आहेत. इंटरनेटवर शोध जरी घेतला तरी असंख्य क्षेत्रांची माहिती समोर येईल. आरोग्य, आर्ट, फायनान्स, सायन्स, अॅनिमेशन, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रात प्रचंड मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक फिल्डची गरज ओळखून कौशल्यपूर्ण शिक्षण निवडल्यास यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समानांतर क्षेत्राची निवड करून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास पारंपरिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगले यश प्राप्त केले जाऊ शकते. त्यामुळे इंटरनेट युगातील विद्यार्थ्यांनी स्वत:चे मार्गदर्शक होउन यशस्वी वाटचाल करा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी केले तर संचालन अर्चना चक्रवर्ती यांनी केले. यावेळी लोकमतच्या कार्मिक विभागाचे अरविंद बावनकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.३० विद्यार्थ्यांना लोकप्रज्ञा पुरस्कारयावेळी लोकमत समूहात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ३० प्रज्ञावंत मुलांना लोकप्रज्ञा पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये पहिल्या वर्गातील हार्दिक तायडे, नैतिक बैस व अभिजित त्रिफळे, दुसऱ्या वर्गातील रितेश गाकरे व हर्षदा घोडे, तिसºया वर्गातील शांतनू धोटे, हसिका अंबडवार, महेक खान व पीयूष रघुवंशी, ४ थ्या वर्गातील सायली नांदे, रिदा सेठ व स्निग्धा गजभिये, ५ व्या वर्गातील हिमांशु बिसेन, गार्गी सोनी व आलोक लोनबेले, ६ व्या वर्गातील सिद्धी ढोके व संबोधी गजभिये, ७ व्या वर्गातील पायल फुकट, तनुश्री खंडाळ व प्रतीक्षा बनसोड, ८ व्या वर्गातील सावेरी टिकले व आर्यन लोनबेले, ९ वीचा शिवा राजू, १० वीचे प्रथम व्यवहारे व गीतिका चटर्जी, ११ वीतील जान्हवी दीक्षित व आसावरी मोरस्कर तसेच आशुतोष मस्के (बीई प्रथम), एम. दिपांशु राजू (बी टेक प्रथम) आणि बीई द्वितीय वर्षाची अभिलाषा पंचपाटकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कारपहिली ते दहावीपर्यंतच्या रुद्र वाघुळकर, युगांक बावने, लोकेश पाल, प्रथम श्रीकुंडवार, प्रेम रहांगडाले, अक्षरा सोनकुसरे, आर्यन कवठेकर, शौर्य बादलवार, गौरी टिकले, सुनिधी सवाई, अनुष्का दडवे, राजवी कुकडे, आशिता माटे, श्रीया कडाले, सुभान हुसैन, यश गाकरे, रिया गायधने, ईशिका ढगे, सत्यम घोडे, अर्पिता नेरकर, प्रियंशू मारवाडी, कार्तिक जोशी, प्रज्वल भाजीपाले, मुनाली मानकर, प्राची नेरकर, अभय धोटे त्रिवेणी बिसेन अशा २७ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपण पुरस्कार प्रदान करण्यात आले.