लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जे. के. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही शाखांतील इयत्ता पाचवीतील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित २५ टक्के जागेवर प्रवेशाकरिता अर्ज जारी करण्यात यावेत आणि ही याचिका प्रलंबित असेपर्यंत या जागा भरण्यात येऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. दोन्ही शाखांतील इयत्ता पाचवीच्या प्रवेश अर्जाकरिता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. परंतु, त्यांनी निवेदनावर काहीच निर्णय घेतला नाही. तसेच, स्वत:ची चूकही दुरुस्त केली नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.
मुलांच्या प्रवेशाकरिता पालक हायकोर्टात : सरकारला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 8:05 PM
मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचा आदेश दिला