लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व हेल्दी फ्युचर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्ल्यू व्हेल व स्वाईन फ्लू यावर कशा पद्धतीने मात करता येईल’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोरभवन येथील रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले.स्वाईन फ्लूचे लक्षण, त्यापासून बचावासाठी करण्यात येणाºया उपायांची माहिती दिली. पालकांनी वेळ काढून मुलांकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.सध्या ब्ल्यू व्हेल गेम व स्वाईन फ्लूची भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. लोकांमध्ये असलेली ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळाची व स्वाईन फ्लूसारख्या आजाराची भीती काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. दीपक जेसवानी, डॉ. आशिष लोथे, डॉ. निखील पांडे, अॅड. महेंद्र लिमये यांनी उपस्थितांशी संवाद साधून आवश्यक माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संदीप यादव यांनी केले. यावेळी हेल्दी फ्युचरचे डॉ. संतोष तिवारी, सुमित नासरे उपस्थित होते.स्वाईन फ्लू संसर्गजन्य : डॉ. जसवानीस्वाईन फ्लू हा आजार एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला होऊ शकतो. हा संसर्गजन्य आजार आहे. कुणाच्या समोर शिंकल्याने स्वाईन फ्लू पसरण्याची शक्यता जास्त असते. स्वाईन फ्लूमध्ये सर्दी, खोकला व खूप ताप असतो. यापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवावे, स्वच्छता ठेवावी, औषधांमुळे हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.ताप जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा - डॉ. लोथेस्वाईन फ्लूचे लक्षण व उपचार यासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेवर लक्ष द्यावे. शक्य झाल्यास तोंडावर मास्क लावावे. जर सर्दी, खोकला व ताप असेल तर सामाजिक जबाबदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. पाणी जास्त प्यावे, व्हॅक्सीनचा उपयोग करावा.मुलांकडे दुर्लक्ष करू नका - डॉ. पांडेब्ल्यू व्हेल गेमबरोबरच बरेच मोबाईल गेम ज्याच्या सवयीमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यासाठी पालकांनी मुलांबरोबर सतत संवाद साधावा. मुलांच्या स्वभावात काही बदल आढळल्यास सतर्क व्हावे, त्यांच्यासोबत एका मित्राप्रमाणे वागावे.पालकांनी सतर्क व्हावे - अॅड. लिमयेब्ल्यू व्हेल गेमसोबतच सोशल मीडियाकडेसुद्धा मुले आकर्षित होत आहे. त्यासाठी घरातील वातावरण पालकांनी सुदृढ ठेवावे, मुलांचा मोबाईल चेक करता येईल, असा संवाद ठेवावा. पालकांनी मुलांच्या मोबाईलची हिस्ट्री सतत चेक करणे गरजेचे आहे.
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:31 AM
लोकमत कॅम्पस क्लब व हेल्दी फ्युचर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्ल्यू व्हेल व स्वाईन फ्लू यावर कशा पद्धतीने मात करता येईल’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे‘ब्ल्यू व्हेल व स्वाईन फ्लू’वर मार्गदर्शन : लोकमत कॅम्पस क्लब व हेल्दी फ्युचर यांचा संयुक्त उपक्रम