लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : २०२१-२२ शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत दवलामेटी ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.१३) सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेत शाळा-महाविद्यालय सुरू करण्यास पालकांनी नकार दर्शविल्यानंतर शासनाच्या निर्णयानुसार संबंधित गावात शाळा सुरू करता येत नाही, असा ठराव ग्रामपंचायतींने पारित केला.
शासन निर्देशानुसार द्रुगधामना हायस्कूल, आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत सरपंच रिता उमरेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी प्राचार्य पुष्पमाला साेमकुवर, ग्रामविकास अधिकारी विष्णू पाेटभरे, व्याहाड पेठ आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्राजक्ता उराडे, तलाठी संकेत बांबाेळे, उपसरपंच प्रशांत केवटे, ग्रा. पं. सदस्य गजानन रामेकर, शुभांगी रवींद्र पाखरे, शकुंतला अभ्यंकर, अर्चना चाैधरी, छाया खिल्लारे, सिद्धार्थ ढाेके, श्रीकांत रामटेके, रक्षा सुखदेवे यांची उपस्थित हाेते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्याकरिता किमान एक महिना संबंधित गावात काेराेनाबाधित रुग्ण नसावा. परंतु दवलामेटी ग्रामपंचायतअंतर्गत २९ जून ते १० जुलैदरम्यान सहा काेराेनाबाधिताची नाेंद असल्याने शासन निर्णयानुसार शाळा सुरू करता येत नाही, असा ठराव पारित केला. यावेळी उपस्थित पालकांनीदेखील शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात येऊ नये, असे मत नाेंदविले. त्यानुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आठवी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात येऊ नये, असा निर्णय घेऊन सर्वानुमते ठराव मंजूर केला. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी विष्णु पोटभरे यांनी केले. संचालन व आभार शिक्षिका वैशाली लोही यांनी मानले. सभेला आशिष चौरे, वामन लिंगायत, लक्ष्मी खंडाळे, लक्ष्मी भोंडवे, माधुरी राऊत, मीना भोंडवे, सुषमा शिंगारे, नंदिनी भगत, ज्योती ठवकर, विकास ठाकरे, सलीम शेख, अरुण कराळे, प्रा जयश्री किरणापुरे, प्रा. जयश्री वाढई, प्रा. प्रगती पाचपोहर, मंदा फालके, आरती भोरे, ज्योती अढावू, सुनिता चव्हाण, वंदना मुसळे उपस्थित होते.