नागपूर: कळमना मार्केटकडे जाणा ऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेली होती. या गाडीत अख्खे कुटुंब होते. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत होती.
या पुलाच्या एका पिल्लरवर स्पॅन बेअरींग करण्यासाठी हाईड्रोलिक जॅकद्वारे उचलण्यात येत होते. याच दरम्यान जॅकहून स्पॅन घसरले. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास भरतनगर चौकाजवळ घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु नागरिकांनी रोष व्यक्त केला. पारडी ते कळमना दरम्यान हा उड्डाणपुल बनत आहे. नैवद्यम हिस्टोरियाच्या मागच्या भागात बनत असलेल्या पुलावर पी७ व पी८ स्पॅनला पिलरपासून काही उंच उचलून बेअरींगचे काम सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी झाली.
घटनेनंतर एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, प्रोजेक्ट डायरेक्टर एन.एल. येवतकर व आमदार कृष्णा खोपडे हे घटनास्थळी पोहचले. या पुलाच्या काही भागातील सळाखी गंजलेल्या सुद्धा आढलल्या. सर्व जॉईंट देखील उघडे पडले होते. पारडी उड्डाणपुलाचे काम कित्येक वषार्पासून सुरू आहे. कामाची गती देखील मंद आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या घटनेमुळे बांधकामाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका?्याला या प्रकल्पातून बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. या संदर्भात एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर एन.एल. येवतकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की मी माहिती घेत आहे. अजूनही पूर्ण माहिती हाती आलेली नाही.
- नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट होणार सुत्रांनी सांगितले की जॅकवरून स्पॅनवरून घसरलेल्या स्पॅनची मजबुती तपासण्यासाठी नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट होणार आहे. तपासात स्पॅन मजबूत निघाल्यास त्याला पुन्हा लावण्यात येईल. या कामाला किमान ७ दिवस लागू शकतात. कामठी रोडवर सुरू असलेल्या डबलडेकर पुलाचे स्पॅन एका वर्षापूर्वी तुटले होते.
(A part of a bridge under construction in Nagpur collapsed)