शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट’ पाहणीत अर्धवट योजना लपवल्या! सदस्यांचा आरोप

By गणेश हुड | Updated: July 10, 2024 21:19 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण व शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली. सन २०२१, २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला.

नागपूर :  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अतंर्गत सुरू असलेल्या शेकडो कामांबाबत लोकप्रतिनिधी, सरपंच यांच्या तक्रारी वाढत आहेत. केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट ’पाहणीत तक्रारी असलेल्या गावांचा समावेश न करता अधिकाऱ्यांनी ठराविक गावांतील  पूर्ण झालेल्या  योजनांची कामे दाखवून आपली पाठ थोपटून घेतली. असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण व शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली. सन २०२१, २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला. १,३०२ योजनांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी ४३० योजना पूर्ण झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. दुसरीकडे जलकुंभासाठी खड्डे खोदले, परंतु कामाला सुरुवात नाही. अशा परिस्थितीत उर्वरित ८७२ योजना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल की नाही. अशी शंका निर्माण झाली आहे.

जल शक्ती मंत्रालयातील एक पथकाने दौऱ्यादरम्यान नागपूर जिल्ह्यातील कामांच्याची पाहणी केली. यात  जलशक्ती मंत्रालयाचे संचालक प्रदीप सिंग, तांत्रिक सल्लागार धीरेंद्र कुमार यांच्यासह इतरांचा समावेश होता.

आढावा बैठकीनंतर  प्रदीप सिंग हे भंडाऱ्यांतील कामांच्या पाहणीसाठी गेले, तर धीरेंद्र कुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील कामांची पाहणी केली.  मात्र पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या  पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना ज्या तालुक्यातील गावांतील योजनांच्या तक्रारी नाही. अशा ठराविक  गावांच्या भेटीवर नेले. पथकाच्या दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व सदस्यांना सुगावा लागू दिला आहे.  समितीने जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वलनी, चिचोली, वाकी, सर्रा यासह नागपूर (ग्रा.) तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. येथील योजनांची कामे पूर्ण झाली असून लोकांच्या तक्रारी नाही. परंतु ज्या ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत किंवा प्रगतीपथावर आहे.  नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. अशा  गावांपासून समितीला लांब ठेवण्यात आले. समितीनेही स्थानिकांशी चर्चा करून पाण्याच्या गरजेची खातरजमा न करता दौया केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांच्याशी  मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सदस्यांना सुगावा लागू दिला नाही-खापरेज्या गावात शुध्द पाणी उपलब्ध होत आहे, अशच् गावामध्ये केंद्रीय समितीला नेले. परंतु मुळात ज्या ठिकाणी आजही नागरिकांना शुध्द पाणी उपलब्ध होत नाही, योजना रखडल्या  आहेत. अशा गावांपासून समितीला दूर ठेवले. समितीनेही नागरिकांकडून पाण्याच्या गरजेची खातरजमा न करता दौरा आटोपता घेतला. योजना संदर्भात समितीकडे कुणी तक्रारी करू नये, यासाठी जि.प.सदस्य व पदाधिकाऱ्यांना पथकाच्या दौऱ्याचा सुगावा लागू दिला नाही. असा आरोप जि.प.सदस्य  प्रकाश खापरे यांनी केला.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर