लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छता ही आमची जबाबदारी असून माझा घर, माझा परिसर, माझे शहर मी स्वच्छ ठेवीन. इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन’, अशी शपथ उपस्थितांना देत महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपाच्या अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचाºयांनी हातात झाडू घेऊन दीक्षाभूमी परिसरात साफसफाई केली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरदरम्यान ह्यस्वच्छता हीच सेवाह्ण मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत १ आॅक्टोबर हा ‘श्रेष्ठ स्वच्छता दिवस’ म्हणून पाळण्यात आला. याअंतर्गत शहरातील प्रसिद्ध आणि प्राचीन वास्तूची स्वच्छता करण्यात आली. दीक्षाभूमी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात नंदा जिचकार यांच्यासह गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता डी. डी. जांभूळकर, निगम अधीक्षक राजन काळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, बाजार अधीक्षक आर. एन. उमरेडकर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, अशोक पाटील, गणेश राठोड, प्रकाश वराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता अमीन अख्तर, रवींद्र मुळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड यांच्यासह सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.झोननिहाय ‘श्रेष्ठ स्वच्छता’‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेंतर्गत ‘श्रेष्ठ स्वच्छता’ दिवस सर्व झोनमध्ये राबविण्यात आला. झोनच्या अधिकारी- कर्मचाºयांनी दीक्षाभूमीकडे येणाºया मार्गांची आणि आणि परिसराची स्वच्छता केली. लक्ष्मीनगर झोनतर्फे दीक्षाभूमी, बोधिवृक्ष व दीक्षाभूमी परिसर, स्तुपाच्या मागील लॉ कॉलेज परिसर, धरमपेठ झोनअंतर्गत काचीपुरा चौक ते अलंकार टॉकीज चौक, हनुमाननगर झोनतर्फे चोखामेळा चौक ते रहाटे कॉलनी चौक टी-पॉर्इंंट, धंतोली झोनने चोखामेळा चौक ते शततारका अपार्टमेंट (नीरी रोड), नेहरूनगर झोनअंतर्गत चोखामेळा चौक ते रहाटे कॉलनी चौक, गांधीबाग झोनअंतर्गत चोखामेळा चौक ते काचीपुरा चौक, लकडगंज झोनअंतर्गत कल्पना बिल्डिंग ते बजाजनगर चौक, आशीनगर झोनअंतर्गत चोखमेळा चौक ते लक्ष्मीनगर चौक, मंगळवारी झोनअंतर्गत बजाजनगर चौक ते कल्पना बिल्डिंग चौक आणि महापालिका मुख्यालयांतर्गत दीक्षाभूमी परिसरातील नियंत्रण कक्षासमोरील परिसर श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता अभियानात महापौरांसह अधिकाºयांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:17 AM
‘स्वच्छता ही आमची जबाबदारी असून माझा घर, माझा परिसर, माझे शहर मी स्वच्छ ठेवीन.
ठळक मुद्देस्वच्छता हीच सेवा : मनपा अधिकाºयांना दिली शपथ