लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या पक्षातील निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावून बाहेरून आणलेल्यांना तिकीट देण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली.पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून, ही यात्रा विदर्भात फिरत आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघामध्ये महाकाळकर सभागृहात सायंकाळी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपा गटनेते दुनेश्वर पेठे, कार्याध्यक्ष जावेद हबीब, प्रवक्ता राजकुमार नागुलवार, उपाध्यक्ष ज्वाला धोटे, महेंद्र भांगे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मोदींसारखेच मुख्यमंत्री फडणवीसांचे काम सुरू आहे. त्यांनी पक्षात कुणीच नेता शिल्लक ठेवला नाही; तसाच फडणवीसांनीही महाराष्ट्रात कित्ता गिरविणे सुरू केले आहे. नितीन गडकरींकडे पूर्वी अनेक खाती होती. आता फक्त एकच खाते राहिले आहे.पाटील म्हणाले, आम्ही ज्यांना पक्षात ताकद दिली त्यांनाच भाजपा उचलत आहे. त्यांना जनतेचा प्रतिसाद आहे, असे ते सांगतात. तर दुसऱ्यांच्या पक्षातील नेते कशाला उचलता, स्वत:च्याच पक्षातील लोकांना तिकिटा का देत नाही?नागपुरातील मेट्रोच्या कामावर त्यांनी टीका केली. मेट्रोला लावलेला पैसा सर्वसामान्यांसाठी खर्च केला असता तर गरिबांची दैना दूर झाली असती. १० ते १५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मेट्रोचा प्रकल्प आणून हे सरकार नेमका काय विकास साधणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल४२ आमदार, मुख्यमंत्री, वित्तमंत्री तरीही विदर्भाच्या विकासाचे काय? : अमोल कोल्हेखा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचे आमिष दाखविल्याने जनतेने ४२ आमदार निवडून दिले. विदर्भाचे पारडे जड झाल्याने मुख्यमंत्री, वित्तमंत्री पदासह डझनभर मंत्री विदर्भात दिले. मात्र विदर्भाच्या विकासाचे काय झाले, राज्य निर्मितीचे काय झाले? मिहानमध्ये पाच वर्षांत ५०० जणांना तरी नोकऱ्या मिळाल्या का? पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाच वर्षात राज्यावरील कर्ज पटीने वाढले. पोलीस भरतीमध्ये ओबीसी, एससी प्रवर्गासाठी जागा नाहीत. मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर क्राईम कॅपिटल होण्याच्या मार्गावर आहे. या सरकारने अपेक्षाभंग केला. महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवाशी खेळण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला.
पक्षाची फोडाफोडी हा भाजपचा व्यभिचारच : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:59 PM
भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली.
ठळक मुद्देफडणवीसांनी स्वपक्षात कुणी नेताच ठेवला नाही