शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

CoronaVirus in Nagpur:नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 9:45 PM

हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२३० लोकांना केले क्वारंटाईन : मनपा प्रशासन सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे. बुधवारी रात्री १५० लोकांना तर गुरुवारी ८० अशा २३० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात प्रामुख्याने मृताच्या कुटुंबीयासह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. मृताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच मृताला कोरोना बाधा कशी झाली याचाही शोध मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी घेत आहेत.प्रभाग क्रमांक ३५ मध्ये हा भाग येत असून त्यात पार्वतीनगर, जोगीनगर, जयभीमनगर, धारीवाल ले-आऊट, रामेश्वरी, काशीनगर हा भाग येतो. येथील लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले. अनेक लोकांनी घरे बंद करून शहरातील नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. काहींनी बुधवारी रात्री बेला, बुटीबोरी, बोरखेडी, हिंगणा, उमरेड, पाचगाव, कुही, सिर्र्सी, गुमगाव, डोंगरगाव, कामठी, कन्हान, कोराडी, कळमेश्वर, टाकळघाट आदी गावात धाव घेतल्याची माहिती आहे.झोपडपट्ट्याबाबत सतर्कतेची गरजकोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह इतरही भागातील झोपडपट्ट्यांवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करून सतर्कता बाळगण्याची गरज आहे. स्लम भागातील लोकांचा बाहेर वाढलेला वावर बघता या ठिकाणी सुरक्षेसाठी कठडे लावून परिसर बंद केले जात असून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील २९३ नोंदणीकृत तर १३१ अघोषित आहेत. त्यातील बहुतांश या मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात आहे. सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या हॉटस्पॉट ठरलेल्या परिसराला लागून मध्य व पूर्व नागपुरात ५८ झोपडपट्ट्या आहेत.कोरोनाबाधितावर प्रथमच अग्निसंस्कारउपराजधानीत मंगळवारी दगावलेल्या पार्वतीनगर येथील २२ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा अंत्यविधी बुधवारी मोक्षधाम घाट येथे दहनविधीतून करण्यात आला. पूर्वी शहरातील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरातील प्रत्येकी एक अशा दोघांचा अंत्यविधी दफनविधीतून करण्यात आला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गाचा धोका सांगितल्यामुळे अंत्यविधीसाठी केवळ तीनच नातेवाईक मोक्षधाम घाटावर पोहचले, तर महापालिकेचेही निवडक अधिकारी खबरदारी म्हणून येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे दाहसंस्कार झाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर