शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

प्रवाशांचे दिवाळे, ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:36 AM

दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते.

ठळक मुद्देतिकीट दर दुपटीने वाढविले : १७ ते २४ आॅक्टोबरमध्ये ‘लूट’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळेच प्रवाशांच्या या गर्दीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्स संचालकांनी आपले दर वाढविले आहेत. स्वत:ची दिवाळी साजरी करीत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांचेच दिवाळे काढण्यास सुरूवात केली आहे. नेहमी प्रवाशांना दिवाळीच्या काळात भाडे न वाढविता आहे त्याच प्रवासभाड्यात पोहोचविणाºया एसटी महामंडळानेही हाच कित्ता गिरवत भाडेवाढ केली आहे.दिवाळीच्या काळात अचानक प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. या काळात नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्या फुल्ल झाल्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्याची पाळी येते. दिवाळीच्या काळातील ही स्थिती पाहून खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक दरवर्षी आपल्या तिकीट दरात भरमसाट वाढ करतात. काहीच इलाज नसल्यामुळे प्रवाशांना अव्वाच्यासव्वा दराचे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पूर्वी एसटी महामंडळ वर्षभर जे तिकीट आकारते त्याच दरात दिवाळीच्या काळात तिकीट आकारत होते. परंतु २०१७ यावर्षी एसटी महामंडळानेही आपल्या तिकीट दरात ५ ते २० टक्के दरवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. दिवाळी संपेपर्यंत ही दरवाढ अशीच कायम राहणार असून, त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.शासनाने ट्रॅव्हल्सचे दर ठरवावेत‘२०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला ट्रॅव्हल्सचे दर ठरवून देण्याचा आदेश दिला होता. परंतु शासनाने ट्रॅव्हल्सचे दर ठरविलेले नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सला होणारे नुकसान दिवाळीच्या काळात भरून काढण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या संचालकांना दरवाढ करावी लागते.’-अ‍ॅड. महेंद्र लुले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बस, टँकर वाहतूक संघअसे वाढले आहे प्रवासभाडेपूर्वी सध्यापुणे ८०० १६०० ते २२००औरंगाबाद ८०० १२००कोल्हापूर १२०० १६०० ते २५००सोलापूर ९०० १२००नाशिक १००० १२००शिर्डी १००० १२००हैदराबाद ८०० १५०० ते २०००इंदोर ८०० ११०० ते १६००