शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

प्रवाशांमध्ये नागपूर-गोवा रेल्वे गाडीची ‘क्रेझ’

By admin | Published: February 09, 2017 2:41 AM

महाशिवरात्रीनिमित्त रेल्वे प्रशासनाने गोव्याच्या मडगाव आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली होती.

उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्या सात दिवसात ८० टक्के बर्थ फुल्ल नागपूर : महाशिवरात्रीनिमित्त रेल्वे प्रशासनाने गोव्याच्या मडगाव आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर या गाडीचे आरक्षण सुरू झाल्यानंतर सातच दिवसात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ही गाडी ८० टक्के बुक झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०२१ नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी शनिवारी २५ फेब्रुवारीला नागपूरवरून सकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी २६ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मडगावला पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केल्यानंतर सातच दिवसात या गाडीतील ८० टक्के बर्थचे आरक्षण झाले आहे. यात स्लिपर क्लासमध्ये २८८ बैकी ८८ बर्थ शिल्लक आहेत. तर थर्ड एसीत ५७६ बर्थपैकी केवळ ३०० बर्थ शिल्लक आहेत. सेकंड एसीतही केवळ २२ बर्थ उरले आहेत तर सेकंड सिटींगमध्येही अतिशय कमी बर्थ उरले आहेत. २६ जानेवारीलाही ही गाडी सोडण्यात आली होती. तेंव्हासुद्धा प्रवाशांनी या गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम या मार्गाने मडगावला जाणार आहे.(प्रतिनिधी) नियमित सुरू करण्याची मागणी नागपूर-गोवा या रेल्वेगाडीला २६ जानेवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर २५ फेब्रुवारीला ही गाडी सोडण्याची घोषणा केली आहे. या गाडीलाही सात दिवसात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी नियमित करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.