नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना सकाळच्या सुमारास झाली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असेही बोलले जात आहे.देवनाथ रामचंद्र बागडे (६६) रा. पंचशीलनगर, सावनेर व वनिता वाघमारे (३५) रा. भांडेवाडी अशी मृतांची नावे आहेत. मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या त्वचा रोग विभागाच्या या इमारतीत महिला आणि पुरुषांचे २०-२० खाटांचे दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी, १७ पुरुष व १२ महिला रुग्ण वॉर्डात उपचार घेत होते. प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वॉर्डात भरती असलेल्या जयमाला राजकुमार दहिवले (४०) यांना एक्स-रे काढण्यासाठी मेडिकलला पाठविण्यात आले. त्यांच्या नातेवाईक वनिता वाघमारे या वॉर्डात थांबून होत्या. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या होत्या.
स्लॅब कोसळून रुग्ण व नातेवाईकाचा मृत्यू; जीर्ण स्लॅबकडे बांधकाम विभागाचे झाले होते दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 9:31 PM