लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील एकही रुग्ण नाही.प्राप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ३ आॅगस्ट रोजी स्वाईन फ्लू संशयित तीन पुरुष व दोन महिलांचा घशातील द्रवाचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत पाठविले. याचा अहवाल आज शनिवारी प्राप्त झाला. यात चंद्रपूर येथील १७ वर्षीय तरुणाला स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. या तरुणावर मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, रुग्णाची प्रकृती स्थिर असून औषधोपचार सुरू आहेत.-मध्य प्रदेश, काटोल व अकोल्यातील रुग्णजानेवारी ते आतापर्यंत नागपुरात निदान झालेल्या स्वाईन फ्लू रुग्णामध्ये दोन मध्य प्रदेशातील असून काटोल, अकोला व आता चंद्रपूर येथील एक-एक रुग्ण आहे. यातील एक मध्य प्रदेश आणि काटोलमधील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. इतर दोन रुग्ण उपचाराने बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तज्ज्ञानुसार, गेल्या दोन वर्षांमध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण उन्हाळ्यात आढळून आले. हा पहिलाच रुग्ण पावसाळ्यात आढळून आल्याने सतर्कता पाळणे आवश्यक झाले आहे.
स्वाईन फ्लूचा आढळला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 1:49 AM
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील एकही रुग्ण नाही.
ठळक मुद्देमेडिकलमध्ये घेत आहे उपचार : आतापर्यंत पाच रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद