लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांना किंवा दाताची झिज झालेल्यांसाठी कृत्रिम दंतरोपण वरदान ठरते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने असे दात तयार करण्यासाठी सुमारे १८ वर्षांपूर्वी उपकरण खरेदी केले, परंतु दर्जाहिन यंत्र प्राप्त झाल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तर सहा महिन्यांपूर्वी रुग्णसेवेत आलेले दीडकोटी रुपयांचे ‘कॅड-कॅम’ यंत्राला लागणारे आवश्यक साहित्य संपल्याने तेही बंद पडले. परिणामी, या रुग्णालयाला ५० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी होऊनही कृत्रिम दातासाठी रुग्णांची वणवण थांबलेली नाही.विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील रुग्णांसाठी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. दातांच्या वाढत्या समस्या, वेडेवाकडे निघालेले दात, दात पडल्यानंतर कृत्रिम दातांचा वापर आदी समस्यांवर मात करण्यासाठी कृत्रिम दाताचा पर्याय महत्त्वाचा ठरला आहे. साधारण २० वर्षांपूर्वी कृत्रिम दातासाठी ‘मेटल्स’ किंवा सोन्याच्या दाताचा वापर व्हायचा. परंतु काळानुसार तो मागे पडला. १९९८-९९मध्ये रुग्णालयाने सिरॅमिक पद्धतीचा कृत्रिम दात बनविणारे यंत्र विकत घेतले. परंतु या उपकरणातील काही पार्टस खराब निघाल्याने सुरूच झाले नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरू झाले तरी १०० पेक्षा जास्त कृत्रिम दात तयार झालेले नसल्याची माहिती आहे.मागील तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रुग्णालयाला शासनाकडून १ कोटी ७० लाख किमतीचे आधुनिक पद्धतीने कृत्रिम दात तयार करणारे ‘कॅड-कॅम’ मिळाले. ११ मे २०१७ रोजी रुग्णालयात दाखल झाले. परंतु दर पत्रकाच्या प्रतीक्षेत हे यंत्र सहा महिने बंद होते. या यंत्रामुळे सात दिवसांत मिळणारे कृत्रिम दात २४ तासात मिळू लागले. मात्र, कृत्रिम दातासाठी रोज येणारे १५० वर रुग्णांचा भार या यंत्रावर पडला. प्रत्येक दातासाठी विशिष्ट वेळ लागत असल्याने रुग्णांची प्रतीक्षा लांबली. यातच ज्या कंपनीने हे यंत्र उपलब्ध करून दिले त्या कंपनीने दिलेले ‘सिरॅमिक’ व ‘झिरकोनिआ’ साहित्य संपले. यामुळे गेल्या महिन्यापासून हे यंत्र बंद पडले आहे. रुग्णालय प्रशासनाने साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठविलाआहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी सिरॅमिक पद्धतीचे कृत्रिम दात तयार करणाऱ्या अद्ययावत यंत्राचीही मागणी केली होती. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. नाईलाजाने डॉक्टरांना कृत्रिम दातासाठी रुग्णांना बाहेर पाठवावे लागत आहे.
५० वर्षांनंतरही कृत्रिम दातासाठी रुग्णांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:31 AM
अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांना किंवा दाताची झिज झालेल्यांसाठी कृत्रिम दंतरोपण वरदान ठरते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने असे दात तयार करण्यासाठी सुमारे १८ वर्षांपूर्वी उपकरण खरेदी केले, परंतु दर्जाहिन यंत्र प्राप्त झाल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तर सहा महिन्यांपूर्वी रुग्णसेवेत आलेले दीडकोटी रुपयांचे ‘कॅड-कॅम’ यंत्राला लागणारे आवश्यक साहित्य संपल्याने तेही बंद पडले. परिणामी, या रुग्णालयाला ५० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी होऊनही कृत्रिम दातासाठी रुग्णांची वणवण थांबलेली नाही.
ठळक मुद्देनागपूर शासकीय दंत रुग्णालय : दीड कोटींचे ‘कॅड-कॅम’ यंत्र पडले बंद