शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नागपुरात ‘ब्रुसेलोसिस’चा आढळला रुग्ण; शासकीय दरबारी अद्यापही नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:30 AM

​​​​​​खासगी हॉस्पिटलमध्ये १४ वर्षीय मुलावर उपचार सुरू

- सुमेध वाघमारे नागपूर : चीनच्या वुहानमध्ये आता ब्रुसेलोसिस जीवाणूच्या संसर्गाने लोक आजारी पडत आहेत. नागपुरातही शुक्रवारी एका १४ वर्षीय मुलाला या आजाराचे निदान झाले. खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय दरबारी त्याची अद्यापही नोंद झालेली नाही.ब्रुसेलोसिसची गाय, मेंढी, शेळ्या आणि कुत्र्यांना मुख्यत: लागण होते. या आजार झालेल्या प्राण्यांचे कच्चे दूध किंवा कमी शिजविलेले मांस खाल्ल्यास तो होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाग्रस्त प्राण्याच्या दुधापासून बनवलेल्या पनीरमधूनही लागण होऊ शकते. पण संसर्गाचे प्रमाण खूप कमी आहे. या आजारावर एक-दीड वर्ष औषधे घ्यावी लागतात.घातक आजार नाहीमेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, लक्षणे दिसायला एक आठवडा ते दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. ताप येणे, डोके दुखणे, सांधे दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. हा आजार घातक नाही. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर म्हणाले, १५ वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात ब्रुसेलोसिसचे नऊ रुग्ण आढळले होते. ब्रुसेलोसिस निर्मूलनाचाही कार्यक्रम आहे.