शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

नागपुरातील हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनमध्ये वाढताहेत रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:12 PM

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनअंतर्गत नव्या वसाहतींभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होऊ पाहत आहे.नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सप्टेंबर महिन्यात तर रुग्णसंख्येसोबतच मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. यात रोज नवे विक्रम होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषत: मृत्यूसंख्येच्या भयावह आकडेवारीने चिंतेचे वातावरण आणखी गडद झाले आहे. शहरात पहिल्या रुग्णाची नोंद मार्च महिन्यात झाली. हा रुग्ण लक्ष्मीनगर झोनअंतर्गत बजाजनगर वसाहतीतील होता. परंतु एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान सर्वाधिक रुग्ण हे झोन क्र. ७ सतरंजीपुरा व व झोन क्र. ६ गांधीबाग झोन अंतर्गत वसाहतीतून आढळून आले. जुलै व ऑगस्ट महिन्यात मात्र सर्वच झोनमधून रुग्णांची नोंद होऊ लागली. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीतील पाच दिवसांच्या रुग्णांची झोननिहाय यादीनुसार म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण दिसून आले.म्हाळगीनगर झोनमध्ये सर्वाधिक रुग्णजिल्हा माहिती कार्यालयातून उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद म्हाळगीनगर झोनमध्ये झाली आहे. ३१ ऑगस्ट रोजी १५६, २ सप्टेंबर रोजी ८८, ३ सप्टेंबर रोजी १३२ तर ५ सप्टेंबर रोजी १८४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ९ सप्टेंबरच्या नोंदीमध्ये ७० रुग्णांची नोंद आहे.हनुमाननगर झोन दुसऱ्या क्रमांकावरमनपा झोनमध्ये हनुमाननगर झोनचा क्रमांक तिसरा असला तरी कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या झोनमध्ये ३१ ऑगस्ट रोजी ५५, २ सप्टेंबर रोजी ७८, ३ सप्टेंबर रोजी १०८ तर ५ सप्टेंबर रोजी ९९ तर ९ सप्टेंबर रोजी ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी झोननंतर सर्वाधिक रुग्ण याच झोनमध्ये दिसून आले.धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनमध्येही रुग्णांची वाढइतर झोनच्या तुलनेत म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचे ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने होत असल्याने किंवा स्वत:हून रुग्ण चाचणीसाठी पुढाकार घेत असल्यानेही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ९ सप्टेंबरच्या यादीनुसार धरमपेठ झोनमध्ये ८६ तर लक्ष्मीनगर झोनमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाली. इतर झोनमध्ये ७० ते ६० दरम्यान रुग्णसंख्या होती.९ सप्टेंबर रोजी झोननिहाय पॉझिटिव्ह आलेले रुग्णलक्ष्मीनगर (क्र. १) ८७धरमपेठ (क्र. २) ८६हनुमाननगर (क्र. ३) ९४धंतोली (क्र. ४) ६०नेहरूनगर (क्र. ५) ५६गांधीबाग (क्र. ६) ३५सतरंजीपुरा (क्र. ७) ०९लकडगंज (क्र. ८) ४३आशीनगर (क्र. ९) ७०महागाळगीनगर (क्र. १०) ७०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर