विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा

By कमलेश वानखेडे | Published: June 13, 2024 05:07 PM2024-06-13T17:07:22+5:302024-06-13T17:09:26+5:30

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Patole expects to resolve the issue of seat allocation in the Legislative Assembly by July 15 | विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा

नागपूर : काँग्रेसला राज्यात सत्ता मिळेल की नाही हा विषय महत्वाचा नाही. तर भाजपा सरकारला खाली खेचून राज्याचे चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट आवश्यक आहे. काँग्रेसचे २८८ जागेवर संघटनात्मक काम सुरू आहे. पण आपल्या सहकाऱ्यांनाही फायदा व्हावा हा उद्देश आहे, असे सांगत विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत कोण करेल हे वेळ सांगेल. सत्तेतील सरकार हाकलने हे महत्वाचे काम आहे. संजय राऊत काही पण बोलू शकतात. आम्ही योग्य वेळी बोलु. आमच्याकडे असा कुठलाही फाम्युर्ला अद्याप ठरलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या सानिध्यात जे लोक आहे आणि तो ओबीसी चेहरा असेल तर त्याला टार्गेट केले जाते. ओबीसी मतांचा वापर करण्याचे काम भाजप करीत आहे. महावितरणतर्फे लावण्यात येणारे स्मार्ट मीटर कंत्राटदाराचे पोट भरून गरीब माणसाला अंधारात ठेवणारी योजना आहे. जनतेला अंधारात घालण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Patole expects to resolve the issue of seat allocation in the Legislative Assembly by July 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.