शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मेडिकलमधील कॅन्सर विभागाच्या अत्याधुनिकीकरणचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा दिलासा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: December 27, 2023 2:23 PM

टेंडरविरुद्धची याचिका फेटाळून लावली

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेंडर प्रक्रियेविरुद्धची एक याचिका फेटाळून लावल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील कॅन्सर विभागाच्या अत्याधुनिकीकरणचा मार्ग मोकळा झाला. न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व अभय मंत्री यांनी हा दिलासादायक निर्णय दिला.

या कॅन्सर विभागाच्या अत्याधुनिकीकरण व विकासाकरिता ७६ कोटी रुपयाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प टीबी वॉर्ड परिसरात उभारला जाणार आहे. त्यामध्ये कॅन्सर रुग्णांसाठी १०० खाटांची सोय राहणार आहे. गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे आहे. प्राधिकरणने यासाठी जारी केलेल्या टेंडरमध्ये पाच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ३० मे २०२३ रोजी एक कंपनी तांत्रिक बोलीमध्ये अपयशी ठरली. त्यानंतर समान दिवशी उर्वरित चारही कंपन्यांच्या वित्तीय बोली उघडण्यात आल्या. त्यावर विजय कंस्ट्रक्शन कंपनीने आक्षेप घेतला होता.

नियमानुसार तांत्रिक बोलीनंतर आवश्यक तक्रारी करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ देणे गरजेचे होते, असे विजय कंस्ट्रक्शनचे म्हणणे होते. असे असले तरी, प्राधिकरणने डी. व्ही. पटेल ॲण्ड कंपनीची वित्तीय बोली मंजूर करून या कंपनीला १४ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यादेश जारी केला. परिणामी, विजय कंस्ट्रक्शनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाला या याचिकेत गुणवत्ता आढळून आली नाही. प्राधिकरणने टेंडर प्रक्रियेत अनियमितता किंवा अवैध कृती केल्याचे दिसून येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरकारची ४.४ कोटी रुपयांची बचतविजय कंस्ट्रक्शन व इतरांपेक्षा डी. व्ही. पटेल ॲण्ड कंपनीने परवडणारे दर दिले होते. त्यामुळे या कंपनीला कार्यादेश जारी करण्यात आला. परिणामी, सरकारची ४ कोटी ३ लाख ८४ हजार ५३५ रुपयांची बचत झाली, अशी महत्वपूर्ण माहिती प्राधिकरणचे वरिष्ठ ॲड. गिरीश कुंटे यांनी न्यायालयाला दिली. ही टेंडर प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आली. सर्वांना योग्य संधी देण्यात आली. सार्वजनिक निधीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली, असेही ॲड. कुंटे यांनी सांगितले.