नागपूर : कोरोना काळात मदतीचे अनेक निवेदने देऊनही कलावंतांना शासनातर्फे मदत जाहीर झाली नाही. याबाबत आक्रोश व्यक्त करत प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध शेवाळे यांनी कलावंतांना मासिक पाच हजार रुपये मानधन लागू करण्याची मागणी पत्रपरिषदेतून केली.
बोगस कलावंतांची मान्यता रद्द करा, अशांवर होणारा अनाठायी खर्च बंद करा, राज्यातील मानधन प्राप्त कलावंतांना केंद्र सरकारचे मानधन लागू करा, कलावंतांची वयोमर्यादा ४५ करावी आणि केंद्र शासनाकडे ५० वर्षे होण्यासाठी शिफारस करावी, कलावंतांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तयार करावी, पालकमंत्र्यांनी सर्वमान्य कलावंतांची निवड जिल्ह्याच्या मानधन समितीवर करावी, प्रतिभावंत प्रबोधनकार कलावंत कला साहित्य संघातील कलावंतांची निवड या समितीवर करावी व महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, सामाजिक समता प्रतिष्ठान व बार्टी पुणे येथे संघातील एक एक कलावंताची नियुक्ती करावी, शासनाच्या धोरणाचे कार्यक्रम लोककलावंतांना प्रत्येक महिन्यात द्यावे व वर्षातून दोनदा प्रत्येक जिल्ह्यात अधिवेशन शासनामार्फत व्हावे, या मागण्या शेवाळे यांनी पत्रपरिषदेतून केल्या. यावेळी संघाचे भिमेश पाटील, क्रांती मीनल उपस्थित होते.
.....