शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सूट मिळण्याच्या प्रतीक्षेत वीज बिल भरणे थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:50 IST

लॉकडाऊन दरम्यानच्या वीज बिलात सूट देण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी वित्त मंत्रालयाला दोन हजार कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु मंत्रिमंडळाने यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे वीज बिलात सूट मिळेल या प्रतीक्षेत नागरिक वीज बिल भरणे टाळू लागले आहेत.

ठळक मुद्दे महावितरणची वसुली प्रभावित : मंत्रिमंडळात अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन दरम्यानच्या वीज बिलात सूट देण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी वित्त मंत्रालयाला दोन हजार कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु मंत्रिमंडळाने यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे वीज बिलात सूट मिळेल या प्रतीक्षेत नागरिक वीज बिल भरणे टाळू लागले आहेत.राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अशी घोषणा केली होती की, राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. या घोषणेनंतर ऊर्जा विभागाने प्रस्तावही तयार केला आहे. परंतु नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. दुसरीकडे वीज बिलात दिलासा मिळेल म्हणून नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपले वीज बिल भरणे सध्या टाळले आहेत. नागपूर परिमंडळाचा विचार केल्यास जवळपास २० टक्के वसुली प्रभावित झाल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणचा बोजा वाढत जात आहेत. बिल भरले तर कदाचित वीज बिलात सूट मिळणार नाही, अशी नागरिकांना शंका आहे. त्यामुळे त्यांनी बिल भरणे थांबवले आहे. यातच महावितरणचे अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत की, सर्वांनाच दिलासा मिळेल. ज्यांनी बिल भरले असेल त्यांच्या पुढच्या बिलामध्ये ती रक्कम समायोजित केली जाईल.अशी आहे अपेक्षासूत्रांचे म्हणणे आहे की, राज्य मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत वीज ग्राहकांना सूट देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. प्रस्ताव अंतर्गत १०० युनिटपर्यंतचा वापर माफ करणे किंवा ७५ टक्के कमी करणे, १०१ ते ३०० युनिटच्या बिलावर ५० टक्के आणि ३०१ ते ५०० युनीटवर २५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जवळपास २० टक्के सूट अपेक्षित आहे. परंतु राज्य सरकार आपली तिजोरी उघडेल तेव्हाच हे मिळणे शक्य आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल