शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गर्भजल तपासणी प्रयोगशाळा फेब्रुवारीपासून सुरू होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 8:02 PM

मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) व संबंधित चाचण्या येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या जातील अशी सिकलसेल रुग्णांना दिलासा देणारी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : सिकलसेल आजार नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) व संबंधित चाचण्या येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या जातील अशी सिकलसेल रुग्णांना दिलासा देणारी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.सिकलसेल आजाराचे अस्तित्व असलेल्या कुटुंबात जन्मणाऱ्या बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी गर्भजल तपासणी केली जाते. त्या तपासणीत बाळाला सिकलसेल आजार आढळून आल्यास पुढील आवश्यक निर्णय घेणे शक्य होते. विदर्भातील सिकलसेल रुग्णांच्या सुविधेसाठी २००६ मध्ये मेयो व मेडिकल रुग्णालयांत गर्भजल तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु, आवश्यक तज्ज्ञ व कर्मचारी नसल्यामुळे दोन्ही प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकला नाही. सध्या गर्भजलाचे नमुने मुंबईला पाठवावे लागत असून पीडितांना प्रत्येक नमुन्यामागे ४ ते ५ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिलेत. परिणामी, शासनाने दोन्ही रुग्णालयांतील प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी वेगात हालचाली करायला सुरुवात केली आहे. प्रयोगशाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. सिकलसेल रुग्णांच्या समस्यांबाबत न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHealthआरोग्य