बेला : भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या अनाेळखी व्यक्तीस जबर धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बेला पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणाझरी शिवारात साेमवारी (दि. १९) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
मृत अनाेळखी व्यक्ती अंदाजे ५० वर्षे वयाेगटातील असून, ताे चिमणाझरी शिवारातील रस्त्याने पायी जात हाेता. दरम्यान एमएच-४०/बीजे-७८९९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्यास धडक दिल्याने ताे गंभीररीत्या जखमी झाला. लागलीच त्यास बेला प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी माेहम्मद रसिद तूर माे. मन्सूरी (३५, रा. असवारी बजरिया माेतीपूर मुजफरपूर बिहार, हल्ली मु. चिमनाझरी शिवार, साहेब पंजाबी ढाब्याजवळ) यांच्या तक्रारीवरून बेला पाेलिसांनी आराेपी वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४,१७७, १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ठेंगणे करीत आहेत.