लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे. बंगळुरूमधील आघाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसारखी विचारांना दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात आयोजित निदर्शने आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड देण्याची मागणी केली. ‘हिटलरशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गौरी लंकेश यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, शासन कोणत्याही पक्षाचे असो, संविधानातील मूल्ये, जीवनाच्या दृष्टीनुसार चालावयास हवे. संविधानाच्या विरोधात जाऊन कुणालाही शासन करता येणार नाही. अशाप्रकारे विचार मांडणाºयांची हत्या करणे म्हणजे संविधानाच्या मार्गाने जाणाºया शक्ती नष्ट करणे होय. शासनाने लंकेश गौरी यांच्या मारेकºयांना कडक शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले, देशात विचारांना संपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा हत्या करणे बहादुरीचे काम नाही. लोकशाहीसाठी लेखणीचा वापर करणाºयांची हत्या होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी गौरी लंकेश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सुनिती देव म्हणाल्या, संविधानानुसार प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु हत्येचा मार्ग अवलंबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आंदोलनात अमिताभ पावडे, हरीश देशमुख, ताराचंद शर्मा, अजय शाहू, दिलीप खैरकर, कॉंग्रेस सेवादलाचे शहर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, प्रभू राजगडकर, सुरेखा देवघरे, डॉ. रेखा बाराहाते, श्याम काळे, संगीता महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना दंड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:29 AM
लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्र दक्षिणायनतर्फे निदर्शने : देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचा आरोप