शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपूरच्या जी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:22 AM

महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या जी.एस.वाणिज्य महाविद्यालयाला राज्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. एका निलंबित शिक्षकाला माहितीच्या अधिकारात आवश्यक माहिती न देणे व माहिती आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे प्राचार्य डॉ.एन.वाय.खंडाईत यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराज्य माहिती आयुक्तांचे निर्देश : तक्रारकर्त्याला माहिती न देणे भोवले

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या जी.एस.वाणिज्य महाविद्यालयाला राज्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. एका निलंबित शिक्षकाला माहितीच्या अधिकारात आवश्यक माहिती न देणे व माहिती आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे प्राचार्य डॉ.एन.वाय.खंडाईत यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.तक्रारकर्ता डॉ.अनिल सारडा यांनी स्वत:वर झालेल्या निलंबनाच्या कारवाईच्यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत प्राचार्य डॉ.खंडाईत यांना माहिती मागितली. मात्र प्राचार्यांनी नियमाप्रमाणे कालावधी संपल्यावरदेखील माहिती दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाकडे अपील केले. आयुक्तांनीदेखील दोन्ही पक्षांना सुनावणीसाठी कार्यालयात पाचारण केले. सुनावणीदरम्यान डॉ.खंडाईत हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती आयुक्तांनी प्राचार्यांनी तक्रारकर्त्याला १० दिवसांच्या आत आवश्यक माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शिक्षणक्षेत्रातील वरिष्ठ प्राधिकरणाकडून अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली करणे ही गंभीर बाब आहे. जर वेळेत माहिती दिली नाही तर दंडात्मक कारवाई होईल, असेदेखील आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटून गेल्यानंतरदेखील तक्रारकर्त्याला प्राचार्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. माहिती आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माहिती आयुक्तांनी २६ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आयोगाची अवमानना केल्याबद्दल डॉ.खंडाईत यांच्यावर ताशेरे ओढले. माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(१) चे उल्लंघन केल्याचा दोष सिद्ध झाल्यामुळे प्राचार्यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर