लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (पारशिवनी) : पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.पेंच जलाशयाच्या कालव्याला ठिकठिकाणी लहान मोठे सिपेज आहेत. याकडे पेंच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. अशातच सोमवारी सकाळी ६ वाजता पेंचपासून ६ कि.मी. अंतरावर गुंढरी (पंडे) गावाजवळ कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले. स्थानिक शेतकरी अविनाश सांगोडे यांनी ही माहिती संबंधित विभागाच्या सर्वेअरला कळविली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने भगदाडामुळे कालव्याच्या सरक्षक भिंतीला तडा गेल्या. पाटबंधारे विभागाने सकाळी ९ वाजता कालवा बंद केला. त्यामुळे पाण्याचा वेग कमी झाला. तोवर सिंचनाचे लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याच्या शेजारी मोतीलाल सांगोडे यांची शेती होती. यात धानाचे पीक होते. ते पाण्यामुळे वाहून गेले. यात सांगोडे यांचे मोठे नुकसान झाले.कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्षपेंचच्या डाव्या कालव्याची अवस्था बिकट आहे. ठिकठिकाणी पॅचेसला भेगा पडल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कामचलावू स्वरुपाची करण्यात आली.दरवर्षी मेंटनन्सच्या नावावर लाखो रुपये खर्च होतो, तरी कालवा फुटण्याच्या घटना कमी झालेल्या नाही. त्यामुळे मेंटनन्स नेमका कशाचा होतो आहे, हा संशोधनाचा विषय आहे.पेंचच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था वाईट आहे. शासन शेतकऱ्यांकडून शेतीचा वायदा वसूल करते. मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.अॅड.आशिष जयस्वालअध्यक्ष, राज्य खनिकर्म महामंडळ
पेंच डावा कालवा फुटला : लाखो लिटर पाणी गेले वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 8:56 PM
पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गुंढरी (पंडे) गावाजवळील घटना