लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएसटी लागू झाल्यानंतर सेवाकर प्रकरणातील प्रलंबित खटले निकाली निघणे आवश्यक असते. याकरिता केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला.आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए शाखेतर्फे धंतोली येथील सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.भीमाशंकर म्हणाले, योजनेत खटला, व्याज आणि दंडाची सूट आहे. न्यायनिर्णय वा अपिलामध्ये ५० लाखांपेक्षा कमी ड्युटी डिमांडमध्ये ७० टक्के आणि ५० लाखांवर ५० टक्के सूट आहे. अशीच सूट तपासणी वा ऑडिटमध्ये ३० जून वा त्यापूर्वी निर्धारित केलेल्या शुल्कावर मिळणार आहे. शिवाय थकबाकी रकमेच्या प्रकरणांमध्ये निर्धारित शुल्काच्या ६० टक्के जर रक्कम ५० लाखांच्या आत असेल तर आणि ५० लाखांवर ४० टक्के आणि ऐच्छिक प्रकटीकरण प्रकरणांमध्ये व्याज आणि दंड वगळता केवळ घोषित केलेली पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.आयुक्त (अपील) संदीप पुरी यांनी योजनेचा लाभ आणि प्रकरणांचा निपटारा करण्यावर, तर सहआयुक्त मुकुल पाटील यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून योजनेची माहिती दिली. सीए वरुण विजयवर्गीय यांनी योजनेतील तरतुदींचे विश्लेषण केले. आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर यांनी भीमाशंकर यांच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली. उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी यांनी आयोजनाचे समन्वयन केले. सचिव सीए साकेत बागडिया यांनी आभार मानले.याप्रसंगी जीएसटीचे संयुक्त आयुक्त नीलेश राऊतकर व बृजेंद्र चौधरी, उपायुक्त स्वचंद चौव्हान व स्वप्निल पवार, सहायक आयुक्त निखिल वडनाम, अधीक्षक सुरेश राऊलू, पिंटू मिश्रा, मिलिंद पांडे, अनिल पंडित, सागर जुगाडे, सीए अक्षय गुल्हाने, सीए संजय एम अग्रवाल, सीए जुल्फेश शाह, सीए ललित लोया, सीए सतीश सारडा, सीए मानव मोहोलकर, सीए राजेश काबरा, सीए आतिश धानुका, सीए गिरधारीलाल शर्मा आणि १२५ पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.
प्रलंबित खटल्याचा निपटारा तातडीने होणार: मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:10 AM
केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला.
ठळक मुद्दे ‘सबका विश्वास योजना’, व्याज व दंडाची सूट