टाकळघाट : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याला साद देत मंगळवारी टाकळघाट येथील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ग्रामपंचायत टाकळघाट येथे लोकमत व ग्रामपंचायत टाकळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच शारदा शिंगारे यांनी केले. हिंगणा पं.स.सभापती सुषमा कडू, एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, माजी पं.स.उपसभापती हरीचंद्र अवचट, सुधा लोखंडे, उपसरपंच नरेश नरड, ज्ञानेश्वर शिंगारे, कृष्णाजी गंधारे याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमत प्रतिनिधी चंदू कावळे यांनी केले तर आभार लोकमत समाचारचे प्रतिनिधी रघुवीर पालिवाल यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं.कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शिबिरात रक्तसंकलनाचे कार्य डॉ.अपर्णा सागरे, रवी गजभिये,स्नेहा कांबळे,रश्मी डगमल,कोमल जामगडे,मंगेश राणे,वैभव बाराहाते,विशाल घोडेश्वर या चमूने केले.
आजचे रक्तदाते
हरीचंद्र अवचट,इक्बाल शेख, मनीष मानकर, रवींद्र पांगुळ, रितेश डबुरकर, रोहित सावरकर, विनोद शेंडे, अविनाश बिबटे, राजेंद्र मावळे, हरिदास चाचरकर, देवानंद मडावी, अक्षय सांभारे, नवज्योत बनसोड, भूषण सोनवणे, संदीप राघोर्ते ,किशोर डेकाटे, सचिन सोनाली, अविनाश सोनवणे ,सचिन मडावी ,शकील शेख ,शुभम सिंग, नीरज भोयर, शुभांगी अहिरवार, शैलेंद्र नागरे, करमचंद घुले ,ज्ञानेश्वर सावरकर, अर्पित बागडे, संजय शिंगारे, अजय मडावी, सिद्धार्थ डांगे, रवींद्र पाटील, योगेश काते, विजय राय, सोमेश्वर शेंडे, सोनुसिंग, संजय राय, आकाश खेडकर, चंद्रशेखर मुटके, वेदांत मासाळ ,उदय बावणे ,मोरेश्वर वानखेडे ,प्रवीण नवले, प्रशांत रागीट, मयंक डफरे,रोशन अवचट,आकाश आत्राम,सतीश कोल्हे,राजू जुलाह, आशिष राऊत,विशाल डायरे,योगेश कोटेकर,प्रफुल राठोड,संघलाल पासवान,चंद्रकांत उईके, प्रशांत कावळे, वैभव अवचट ,अनंता मोरवाल ,होमदेव कावळे, उमेश ऐंगडे,परिवर्तन सूर्यवंशी, मनोज शेंडे, राकेश भगत, उमेश बांगरे, दीपक उईके ,सचिन भोयर ,करण कुमार, अमित पालीवाल ,सन्नी मोडक, अक्षय वसाके, पूजा कावळे, दिलावर कावळे, रामचंद्र सावरकर, शुभम झापे, विजय मस्के, जितेश फुसे ,संजय गुपचे, अनिकेत गुलाबे, गणेश सोनुले, दर्शन पारेकर, कल्पेश मेंढे, मनोज हिवरकर, प्रभाकर चटप,पुनम शिंगारे, अमोल भोले, राजू घोडाम, विनोद डायरे, सुमित मरडवार,यश तिमांडे, आशिष उईके, शुभम सावरकर ,जयंत बोरीकर, रवी आदे, प्रबल मून, नितेश नेहारे, प्रदुल भोयर, निकेश वैरागे, राजकुमार अहिरवार, सुरज शेंडे, शुभम भोयर, छगन अडकिने, विकास ढोरे, राजकुमार पवार, रघुवीर पालीवाल, चंद्रशेखर कावळे, किशोर गंधारे, आशिष डायरे, तेजस बगणे, अतुल शेरेकर यांनी रक्तदान केले.