लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाबाहेरील व्यक्तीने विदर्भात गुंतवणूक करावी आणि पैसा कमवून निघून जावे, यापेक्षा नागपूरसह विदर्भातील लोकांनी मोठे उद्योजक व्हावे आणि विदर्भाचे नाव देशस्तरावर न्यावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५४ वा स्थापनादिन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये शनिवारी पार पडला. यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या ‘व्हीआयए-सोलर उद्योग गौरव पुरस्कार-२०१७’मध्ये विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील मध्यम व लघु उद्योजकांना सात वर्गवारीत नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर खासदार अजय संचेती, सोलर समूहाचे चेअरमन सत्यनारायण नुवाल आणि व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे होते.गडकरी म्हणाले, विदर्भातील लोकांमध्ये उद्योजक होण्याचे गुण आणि क्षमता आहे. मोठे होण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीसह विदर्भातील उद्योजकांना पुढे आले पाहिजे. विदर्भाच्या क्षमतेला अधिक मजबुती प्रदान करावी आणि दुर्बलतेला ताकदीत परिवर्तित करून उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, हे सरकारचे धोरण आहे. या अभिनव पुढाकारासाठी व्हीआयए अभिनंदनास पात्र आहे. व्हीआयएने विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगरत्नांचा गौरव वाढविला आहे. त्यामुळे अन्य व नवीन उद्योजकांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल.उद्योजकांनी पुढे यावेप्रास्ताविकेत अतुल पांडे म्हणाले, व्हीआयएच्या स्थापनादिनी काही नवीन करण्याचा प्रयत्न असतो. या शृंखलेत यावर्षी पुरस्कार सुरू केले आहेत. विदर्भातील उद्योजकांनी अन्य उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. विदर्भातील सर्व उद्योजकांना या पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन केले. या पुरस्कारासाठी सर्व नामांकन, संपूर्ण प्रक्रियेची स्कॅनिंग आणि आॅडिट करणारे न्यायमूर्ती विजय डागा यांचे आभार मानले.सत्यनारायण नुवाल म्हणाले, नैसर्गिक संशोधनांनी परिपूर्ण विदर्भाला सर्वाधिक प्रगतिशील औद्योगिक क्षेत्र बनविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. हा पुरस्कार याकडे इशारा करीत आहे. या पुरस्काराने विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन मिळून, त्यांना सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास मदत मिळेल. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, महापौर नंदाताई जिचकार, माजी खासदार दत्ता मेघे, गिरीश गांधी, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, व्हीआयएचे संस्थापक अध्यक्ष हरगोविंद बजाज, व्हीआयए लेडीज विंगच्या अध्यक्षा साची मलिक, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, सुरेश अग्रवाल, प्रवीण तापडिया, आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह, अशोक चांडक, वेस्टर्न कोलफील्डचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र, हितवादचे राजेंद्र पुरोहित, व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, व्हीआयएचे रोहित अग्रवाल, ओ.एस. बागडिया, पंकज बक्षी, प्रशांत मोहता, आर.बी. गोयनका यांच्यासह व्हीआयएचे पदाधिकारी, विदर्भातील उद्योगांचे संचालक, सीईओ आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन व्हीआयएचे पदाधिकारी संजय अरोरा आणि शिल्पा अग्रवाल यांनी केले. व्हीआयएचे सचिव डॉ. सुहास बुद्धे यांनी आभार मानले.व्हीआयए लाईफटाइम पुरस्कारसात वर्गवारीतील पुरस्कारासाठी विदर्भातील १११ उद्योजकांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ७७ जण नागपूरचे होते. याव्यतिरिक्त व्हीआयए लाईफटाइम पुरस्कार हल्दीराम फूड्सचे शिवकिशन अग्रवाल यांना देण्यात आला. त्यांच्यावतीने त्यांचे पुत्र कमल अग्रवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. याशिवाय व्हीआयएचे कार्यालयीन पदाधिकारी के.एस. बालकृष्णन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विदर्भातील लोकांनी मोठे उद्योजक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:52 AM
विदर्भाबाहेरील व्यक्तीने विदर्भात गुंतवणूक करावी आणि पैसा कमवून निघून जावे, यापेक्षा नागपूरसह विदर्भातील लोकांनी मोठे उद्योजक व्हावे आणि विदर्भाचे नाव देशस्तरावर न्यावे,
ठळक मुद्दे नितीन गडकरी : व्हीआयएचा ५४ वा स्थापनादिन व पुरस्कार वितरण सोहळा