शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आजच्या शिक्षण पद्धतीचा टक्केवारीकडे कल; लीला पुनावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:42 AM

आजचे शिक्षण केवळ टक्केवारीवर केंद्रित असून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जीवन जगता येईल, असे कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांनी येथे केले.

ठळक मुद्देकौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक

आॅनलाईन लोकमतनागपूर : आजचे शिक्षण केवळ टक्केवारीवर केंद्रित असून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जीवन जगता येईल, असे कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांनी येथे केले.पुनावाला यांनी लोकमत भवनाला बुधवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकमत मीडिया समूहाच्या वरिष्ठ संपादकीय सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत त्यांचे पती फिरोज पुनावाला आणि अ‍ॅड. गुरू रोडा मेहता उपस्थित होते. लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले.लीला पुनावाला फाऊंडेशनतर्फे अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासाठी सर्व पाहुणे नागपुरात आले होते. यावर्षी फाऊंडेशनतर्फे विदर्भातील ४७८ विद्यार्थिनींना ४० हजार ते एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली आहे. आम्ही विद्यार्थिनींना केवळ शिष्यवृत्तीच देत नाही तर प्रशिक्षण देऊन त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतो, असे पुनावाला यांनी सांगितले.७३ वर्षीय लीला पुनावाला या ‘अल्फा लावल’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विद्यार्थिनींना मदत करण्याच्या मोहिमेबद्दल त्यांनी सांगितले की, हा प्रवास २३ वर्षांपूर्वी मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील केवळ २० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन सुरू झाला. उत्तर-पूर्व जिल्ह्यातील विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने आकर्षित झाल्यामुळे नंतर आम्ही सातारा जिल्ह्यातील पाचगणीला जोडले. त्यानंतर मोहिमेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात केला. चार वर्षांपूर्वी विदर्भ क्षेत्रात कार्य सुरू केले.चर्चेत सहभागी होत फिरोज पुनावाला यांनी फाऊंडेशनच्या २३ वर्षांच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, लीला फाऊंडेशनने आतापर्यंत सात हजारांपेक्षा जास्त विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली आहे. आम्ही प्रशासकीय खर्चाची मर्यादा केवळ १० टक्क्यांपर्यंत ठेवून जास्त पैसा लाभार्थींना देतो. यावर्षी एकूण ११.५० कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपये शिष्यवृत्तीवर खर्च होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.लीला पुनावाला म्हणाल्या, फाऊंडेशनतर्फे वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर आलेल्या अर्जांना निवड समितीकडे पाठवून लाभार्थींच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येते.लीला पुनावाला यांच्या ४९ सहकाऱ्यांनी पीएच.डी पदवी घेतली आहे. अनेक जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करून राज्य शासनात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.पुनावाला १९४७ मध्ये आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानातून पुणे येथे आल्या. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. ही पदवी संपादन करणाºया त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी ‘अल्फा लावल’मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षा बनल्या. त्यांच्या कार्यकाळात ‘अल्फा लावल’ची उलाढाल ५०० दशलक्षवरून २.५० बिलियन रुपयांवर पोहोचली. सामाजिक आणि विशेष कार्यासाठी त्यांना १९८९ मध्ये पद्मश्री मिळाली.या प्रसंगी अशोक जैन यांच्या हस्ते लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा लिखित ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ हे पुस्तक आणि लोकमत व लोकमत समाचारचे विशेष दिवाळी अंक त्यांना भेटस्वरुपात देण्यात आले.