सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : गत आठवड्यात दिलासा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार १३ तालुक्यात ५,२९१ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७७४ (१४.६२ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३७,८८९ रुग्णांची नोंद झाली तर २२१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मृतांची संख्या १३ इतकी होती. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२४,६६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
काटोल तालुक्यात ४२६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कोंढाळी आणि येनवा केंद्रांतर्गत येणाºया गावात प्रत्येकी ४ रुग्णांची नोंद झाली. नरखेड तालुक्यात २५ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील ४ तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३७१ तर शहरात १३९ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील सावरगाव प्राथमिक केंद्रांतर्गत येणाºया गावात (५), जलालखेडा (३), मेंढला (२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अंतर्गत येणाऱ्या गावात ११ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ३ तर ग्रामीणमधील १९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६४३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ६०९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
कुही तालुक्यात १५१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही शहरात ९, वेलतूर (३) तर तितूर येथे (२) रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ४५९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वानाडोंगरी येथे सर्वाधित ४१ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,५३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १०,२५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
कळमेश्वर तालुक्यात १३९ रुग्णांची नोंद
कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी तालुक्यात १३९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ९३ तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात घोराड येथे सर्वाधिक ८ रुग्णांची भर पडली.