शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

पत्नीने पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीला पूर्णविराम

By admin | Published: November 02, 2015 2:17 AM

पत्नीने स्वत:च्या पतीविरुद्ध केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूर्णविराम दिला आहे.

हायकोर्ट : दोन्ही पक्षात आपसी सहमतीने तडजोडनागपूर : पत्नीने स्वत:च्या पतीविरुद्ध केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूर्णविराम दिला आहे. दोन्ही पक्षात आपसी तडजोड झाल्यामुळे यासंदर्भात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित प्रकरण रद्द करण्यात आले आहे.प्रकरणातील माहितीनुसार, कविता व सुनील (काल्पनिक नावे) यांचे १० आॅगस्ट २०१३ रोजी लग्न झाले. यानंतर आपसात पटेनासे झाल्यामुळे कविताने घटस्फोटासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, सुनीलने विवाह कायम ठेवण्यासाठी याचिका केली आहे. दोन्ही याचिका प्रलंबित आहेत. दरम्यान, ३१ जानेवारी २०१४ रोजी कविता महाविद्यालयातून घरी परत जात असताना सुनीलने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. परिणामी कविताने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून सुनीलविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(ड) व ५०६ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला.यानंतर सुनीलने स्वत:ला आरोपमुक्त करण्यासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज सादर केला. ३१ मे २०१५ रोजी न्यायालयाने अर्ज मंजूर केला. या आदेशाविरुद्ध कविताने सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. गेल्या ३१ जुलै रोजी सत्र न्यायालयाने अर्ज मंजूर करून प्रकरण प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडे पुनर्निर्णयासाठी परत पाठविले. या आदेशाला सुनीलने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयात अर्ज प्रलंबित असताना कविता व सुनीलमध्ये तडजोड झाली. दोघांनीही स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा व कौटुंबिक न्यायालयातील याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित प्रकरण रद्द करून दोघांनाही दिलासा दिला.(प्रतिनिधी)