शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विना परवानगी धावत आहेत प्रचाररथ

By admin | Published: February 13, 2017 10:17 PM

खासगी व व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - खासगी व व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १४ वाहनांनी परवानगी घेतली आहे. यामुळे विना परवानगी मोठमोठे होर्डिंग व निवडणूक चिन्हांची प्रतिकृती लावून शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहे. यात शासनाचा महसूल बुडत आहे, शिवाय अशा वाहनांकडून अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. शहरात ११३५ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराचा वेगही वाढला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांना हात, कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, कप-बशी, हत्ती, सिलिंडर, नगारा, असे आकार देऊन किंवा निवडणूक चिन्हांचे, उमेदवाराचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौका-चौकांतून फिरत आहे. विशेष म्हणजे, प्रचाराचे प्रभावी तंत्र मानले जाणारे प्रचाररथ तयार करताना वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नसते. वाहनांच्या बाह्य स्वरूपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात, तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र,  प्रचाररथ  किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाची बाह्य रचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना अशा घटकांचीी तपासणी करून आरटीओकडून परवानगी दिली जाते. मात्र आतापर्यंत नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून १३ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून केवळ एका वाहनांनी आरटीओत हजेरी लावून परवानगी घेतली आहे. यातून आरटीओला सुमारे १४ हजार रुपये महसूल मिळाला आहे. मात्र उमेदवारांची संख्या लक्षात घेतल्यास परवानगी घेतलेल्या वाहनांची संख्या फारच कमी असल्याचे खुद्द आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  असे आहेत नियम प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार जाहिरातीचा आकार ठरविण्यात आला आहे. वाहनांच्या दर्शनी भागावर जाहिराती लावण्यास बंदी आहे. जाहिरात वाहनाच्या लांबी, रुंदीपेक्षा जास्त नसावी. जाहिरातीमुळे वाहनाचे हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, रिअर व्हु मीरर, नंबर प्लेट आदी आच्छादित होणार नाही, पक्षाचा झेंडा वाहनचालकाच्या दृष्टीसमोर नसावा. चकाकणाऱ्या, प्रकाशमान जाहिरातींवर निर्बंध असून ३.८ मीटर उंचीपर्यंतच जाहिरात लावण्याला मंजुरी आहे.