शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मुलाखतीच्या नावाखाली देहविक्रयाच्या धंद्यात ढकलणारा नागपुरात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:27 AM

नोकरीची आॅनलाईन जाहिरात देऊन मुलाखतीला बोलविल्यानंतर सुस्वरूप तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका आरोपीचा अकोल्याच्या तरुणीने (वय २३) बुरखा फाडला.

ठळक मुद्देअकोल्याच्या तरुणीचे प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीची आॅनलाईन जाहिरात देऊन मुलाखतीला बोलविल्यानंतर सुस्वरूप तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका आरोपीचा अकोल्याच्या तरुणीने (वय २३) बुरखा फाडला. तिने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी नितीन आनंद पुरोहित (वय ४०) याला अटक केली.आरोपी नितीन पुरोहित हा बेलतरोडीच्या श्यामनगरातील कृष्णा रेसिडेन्सीमध्ये राहतो. नावाला तो एका खासगी इन्शुरन्स कंपनीचे काम करतो. २०१ क्रमांकाच्या सदनिकेत त्याने कार्यालय थाटले आहे. तेथून त्याचा भलताच गोरखधंदा चालतो.आधी सुस्वरूप तरुणींना नोकरीचे आमिष दाखवायचे आणि मुलाखतीला बोलवून घ्यायचे आणि नंतर तिला एका रात्रीत १० ते १५ हजार रुपये कमविण्याचा प्रस्ताव देऊन तिला देहविक्रयाच्या दलदलीत ढकलायचे, अशी नितीनची कार्यपद्धती आहे.तक्रारदार तरुणी एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाला शिकते. तिच्या काही मैत्रिणी रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गेल्या आणि नंतर बेपत्ता झाल्या. त्यांना देहविक्रय करवून घेणाऱ्या दलालांनी विकल्याचा संशय असल्याने या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही तरुणी प्रयत्नरत होती. मोबाईल लोकेटरमधून तिने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात बघितली. चांगल्या रोजगाराची त्यात हमी असल्याने तिने जाहिरातीत नमूद आरोपी नितीनच्या मोबाईलवर फोन केला. आरोपीने तिला आपल्या नागपुरातील कार्यालयात मुलाखतीसाठी बोलविले. त्यानुसार पीडित तरुणी बुधवारी दुपारी रेल्वेने अजनी स्थानकावर पोहचली. येथे आरोपी तिला घ्यायला आला. कारमधून तिला दोन तास इकडेतिकडे फिरविल्यानंतर सायंकाळी ५.१५ वाजता आरोपीने तिला आपल्या बेलतरोडीतील सदनिकेत नेले. काही वेळ बातचित केल्यानंतर आरोपीने सदनिकेचे दार बंद केले आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तुला एका रात्रीत १५ ते २० हजार रुपये मिळेल, असे आमिष दाखवून आरोपी नितीन तिच्याशी लज्जास्पद चाळे करीत होता. आरोपीचे एकूणच वर्तन व्हॉटस्अ‍ॅपवरील मेसेज बघून तिला त्याचा संशय आल्याने तरुणीने आधीच तयारी करून ठेवली होती. तिने अकोल्याचे नगरसेवक शशिकांत चोपडे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. चोपडेंनी येथील सामाजिक कार्यकर्ते पंजू तोतवानी, शिवसेनेचे टिंकूसिंग दिगवा, युवा सेनेचे हितेश यादव यांना ही माहिती दिली. त्यांनी तरुणीला धीर देऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहोचविले.पोलीस ठाण्यात व्हॉटस्अ‍ॅप चॅटिंगतरुणीच्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे एपीआय आय.एस. हनवते यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी नितीनला पोलिसांनी अटक केली. अटकेपूर्वी पोलिसांनी काही वेळेसाठी आरोपी नितीनचा मोबाईल ताब्यात घेतला, नंतर मात्र त्याला तो परत केला. त्यानंतर तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यापर्यंत आरोपी नितीन पोलीस ठाण्यात बसून बराचवेळ व्हॉटस्अ‍ॅप चॅटिंग करीत होता. पोलिसांनी त्याला ही मुभा कोणत्या प्रेमापोटी दिली, ते कळायला मार्ग नाही. दरम्यान, नितीनने अशाप्रकारे किती तरुणींना जाळ्यात ओढले, त्याची चौकशी व्हावी, अन्यथा आपण आंदोलन करू, अशी भूमिका पीडित तरुणीने घेतली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा