शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

सतीश उके यांच्याविरुद्धची याचिका मुख्य न्यायमूर्तींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:30 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी बुधवारी अ‍ॅड. सतीश उके यांच्याविरुद्धची तिसरी फौजदारी अवमानना याचिका सुनावणीसाठी न्यायपीठ ठरविण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह मूख्य न्यायमूर्तींकडे पाठविली.

ठळक मुद्देहायकोर्ट : सुनावणीसाठी न्यायपीठ ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी बुधवारी अ‍ॅड. सतीश उके यांच्याविरुद्धची तिसरी फौजदारी अवमानना याचिका सुनावणीसाठी न्यायपीठ ठरविण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह मूख्य न्यायमूर्तींकडे पाठविली.न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. ही याचिका बुधवारी या न्यायपीठासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, अ‍ॅड. उके यांनी न्यायालय अवमानना कायद्यातील तरतूद दाखवून ज्या न्यायपीठाने अवमानना याचिका दाखल करून घेतली तेच न्यायपीठ संबंधित याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व व्ही. एम. देशपांडे यांनी उके यांच्याविरुद्धची तिसरी फौजदारी अवमानना याचिका मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविली.आधीच्या एका अवमानना प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने २४ ऑगस्ट २०१८ रोजी उके यांना त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांची माहिती मागितली होती. त्यासाठी त्यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. त्यानुसार उके यांनी १९ सप्टेंबर रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील केतकी जोशी यांनी त्यावर प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे, प्रकरणावर १७ ऑक्टोबर २०१८ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली. त्यापूर्वी उके यांनी १४ सप्टेंबर २०१८ रोजी सरकारी वकील कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करून जोशी यांना कोण सूचना करीत आहे व त्या सूचना लेखी आहेत की मौखिक, याची माहिती मागितली होती. त्याविषयी कळल्यानंतर जोशी यांनी हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करून उके यांच्या या दबावतंत्रामुळे प्रतिज्ञापत्र दाखल करू शकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन उके यांची ही कृती न्यायदान प्रक्रियेत हस्तक्षेप व अडथळा निर्माण करणारी असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच, उके यांच्याविरुद्ध तिसरी अवमानना याचिका दाखल करून घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल